ruturaj gaikwad twitter
Sports

दुसऱ्याच चेंडूवर Ruturaj Gaikwad रिटायर्ड हर्ट! Duleep Trophy मध्ये नेमकं काय घडलं?

Ruturaj Gaikwad Retired Hurt In Duleep Trophy: इंडिया सी संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाड दुसऱ्याच चेंडूवर रिटायर्ड हर्ट होऊन माघारी परतला आहे.

Ankush Dhavre

दुलीप ट्रॉफी स्पर्धेतील दुसऱ्या फेरीतील सामन्यांना सुरुवात झाली आहे. स्पर्धेतील इंडिया ए चा संघ इंडिया डी संघाविरुद्ध दोन हात करतोय. तर इंडिया सी चा सामना इंडिया बी संघाविरुद्ध सुरु आहे. या सामन्यात इंडिया बी चा कर्णधार अभिमन्यू ईश्वरनने नाणेफेक जिंकला आणि इंडिया सी संघाला प्रथम फलंदाजीचं आमंत्रण दिलं आहे. दरम्यान सामन्यातील दुसऱ्याच चेंडूवर कर्णधार ऋतुराज गायकवाड रिटायर्ड हर्ट होऊन माघारी परतला आहे.

ऋतुराज गायकवाड दुखापतग्रस्त

या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या इंडिया सी संघाला सुरुवातीलाच मोठा धक्का बसला. सामन्यातील दुसऱ्याच चेंडूवर ऋतुराज गायकवाड दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे त्याला मैदान सोडावं लागलं आहे.

काय आहे कारण?

ऋतुराज गायकवाड सलामीला फलंदाजीला आल्यानंतर मुकेश कुमार पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाजीला आला. त्याच्या या षटकातील पहिल्या चेंडूवर ऋतुराज गायकवाडने चौकार खेचला. त्यानंतर पुढील चेंडूवर तो दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे त्याला मैदान सोडावं लागलं. त्याच्याऐवजी रजत पाटीदार फलंदाजी करण्यासाठी मैदानावर आला. ऋतुराज गायकवाडने मैदान का सोडलं, हे अजूनही समजू शकलेलं नाही. मात्र त्याची दुखापत गंभीर नसल्याचं म्हटलं जात आहे.

दुखापतीमुळे घ्यावी लागली होती माघार

ऋतुराज गायकवाड दुखापतग्रस्त होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असताना, त्याला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली होती. त्यानंतर त्याने दमदार कमबॅक केलं होतं.

या सामन्यासाठी असे आहेत दोन्ही संघ:

इंडिया B संघ: अभिमन्यू ईश्वरन, रिंकू सिंह, सरफराज खान, सुयश प्रभुदेसाई, यशस्वी जैस्वाल, के. नितीश कुमार रेड्डी, मुशीर खान, वॉशिंग्टन सुंदर, हिमांशू मंत्रे, नारायण जगदीशन, मोहित अवस्थी, मुकेश कुमार, नवदीप सैनी, राहुल चहर, साई किशोर

इंडिया C संघ: बाबा इंद्रजीत, रजत पाटीदार, रुतुराज गायकवाड, साई सुदर्शन, सूर्यकुमार यादव, अंशुल कांबोज, गौरव यादव, मानव सुथार, अभिषेक पोरेल, आर्यन जुयाल, हिमांशू चौहान, हृतिक शोकीन, मयंक मारकंडे, संदीप वॉरियर, विजयकुमार वैशाक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election Commission: 'मतचोरीच्या खोट्या आरोपांना निवडणूक आयोग घाबरत नाही',: मुख्य निवडणूक आयुक्त

Vaishno Devi Yatra: वैष्णो देवीची यात्रा पूर्णपणे थांबवली, भाविकांना परत जाण्याचे आवाहन; नेमकं कारण काय?

Maharashtra Live News Update: पेशवे जयंतीनिमित्त रॅली मध्ये सहभाग घेत खासदार मेधा कुलकर्णी यांनी चालवली दुचाकी

Priya Bapat: प्रिया बापटचा स्पेशल बॉसी लूक; लवकरच झळकणार नव्या भूमिका

Asia Cup 2025 : आशिया कपसाठी पाकिस्तानी संघाची घोषणा, PCB चा बाबर आझम-मोहम्मद रिझवानला धक्का

SCROLL FOR NEXT