Ruturaj Gaikwad- Yashasvi Jaiswal Viral Video twitter
Sports

IND vs IRE 1st T20I: गडबड है भाई गडबड है!एकाच दिशेने धावले ऋतुराज अन् जयस्वाल; मजेशीर VIDEO होतोय व्हायरल

Ruturaj Gaikwad- Yashasvi Jaiswal Viral Video: यशस्वी जयस्वाल आणि ऋतुराज गायकवाड यांच्यात असं काहीतरी घडलं ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Ankush Dhavre

India vs irelnad Ruturaj Gaikwad- Yashasvi Jaiswal Viral Video:

भारत विरूद्ध आयर्लंड या दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना डब्लिनमध्ये पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने डकवर्थ लुईस नियमानूसार २ धावांनी विजय मिळवला आहे.

या सामन्यात भारतीय संघातील खेळाडूंच्या नावे अनेक मोठ मोठ्या विक्रमांची नोंद झाली आहे. दरम्यान सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वाल आणि ऋतुराज गायकवाड यांच्यात असं काहीतरी घडलं ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

तर झाले असे की, भारतीय संघ १४० धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानावर आला होता. त्यावेळी दुसऱ्या षटकात यशस्वी जयस्वाल आणि ऋतुराज गायकवाड यांची जोडी मैदानावर होती. जोशुआ लिटिलच्या तिसऱ्या चेंडूवर शॉट खेळताच यशस्वी जयस्वालने १ धाव घेण्याचा प्रयत्न केला.

नॉन स्ट्राईकला असलेल्या ऋतुराज गायकवाडनेही धाव घेतली. मात्र त्याने जेव्हा पाहिलं की चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात गेला त्यावेळी ऋतुराज गायकवाडने धाव घेण्यास नकार दिला. मात्र त्यावेळी यशस्वी अर्ध्यापेक्षा जास्त अंतर पुर्ण केलं होतं. त्यामुळे दोन्ही फलंदाजांनी एकाच दिशेने धाव घेतली.

सुदैवाने आयर्लंड संघातील खेळाडूंच्या चुकीच्या थ्रोमुळे दोघेही थोडक्यात बचावले. त्यावेळी ऋतुराज गायकवाडने दुसऱ्या दिशेने धावत डाईव्ह मारली. त्यामुळे तो बाद होता होता थोडक्यात बचावला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे. (Latest sports updates)

भारतीय संघाचा विजय..

या सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्याने सामन्याचा निकाल डकवर्थ लुईस नियमानूसार लावण्यात आला आहे. भारतीय संघाने या सामन्यात २ धावांनी विजय मिळवला आहे. या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर भारतीय संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना कर्णधार जसप्रीत बुमराहने ४ षटक २४ धावा खर्च करत २ गडी बाद केले. तर प्रसिद्ध कृष्णा आणि रवी बिश्नोईने देखील प्रत्येकी २-२ गडी बाद केले. तर अर्शदीप सिंगने १ गडी बाद केला.

भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी १४० धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाला केवळ ६.५ षटके खेळायला मिळाली. यादरम्यान भारतीय संघाने २ गडी बाद ४७ धावा केल्या होत्या.

डकवर्थ लुईस नियमानुसार सामना थांबला त्यावेळी भारतीय संघ २ धावांनी पुढे होता. त्यामुळे भारतीय संघाला २ धावांनी विजयी घोषित करण्यात आलं. यासह भारतीय संघाने ३ सामन्यांच्या मालिकेत १-० ची आघाडी घेतली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Apurva Nemlekar: बाबो! 'रात्रीस खेळ चाले' मधली शेवंता इतकी बदलली की, ओळखताही येईना

Maharashtra Live News Update : काँग्रेस पक्ष नेत्यांचा पक्ष नाही तर कार्यकर्त्यांचा पक्ष आहे - हर्षवर्धन सपकाळ

Pune Rave Party: पिशवीच २ ग्रॅमची, मग २.७० ग्रॅम कोकेन कुठून आलं? ती महिला कोण? खडसेंच्या जावयाच्या वकिलांना शंका

Phone In Toilet: तुम्हाला टॉयलेटमध्ये फोन वापरण्याची सवय आहे? आरोग्यावर होतील'हे' गंभीर परिणाम

Government Taxi Service: राज्यात लवकरच सुरू होणार सरकारी रिक्षा-टॅक्सी सेवा; Ola, Uber ला देणार टक्कर

SCROLL FOR NEXT