RR VS RCB Highlights x
Sports

RR VS RCB Highlights : 'रॉयल्स'च्या लढतीत बंगळुरूच सरस, सॉल्ट-कोहलीचे अर्धशतक अन् घरच्या मैदानावर राजस्थानचा पराभव

RR VS RCB Match Updates : राजस्थान विरुद्ध बंगळुरू या लढतीमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सहज विजय झाला आहे. या सीझनमध्ये घरच्या स्टेडियमवर पहिल्यांदा खेळताना राजस्थान रॉयल्सला पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

Yash Shirke

IPL 2025 मधील राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज विजय मिळवला आहे. आयपीएल २०२५ मध्ये घरच्या मैदानावर म्हणजे सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळताना राजस्थान रॉयल्सचा पराभव झाला आहे. बंगळुरूने ९ विकेट्सने राजस्थानला पछाडले.

सवाई मानसिंग स्टेडियमवर आज राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हा सामना खेळला गेला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार रजत पाटीदारने टॉस जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचे ठरवले. मैदानात फलंदाजीसाठी उतरलेल्या राजस्थानच्या खेळाडूंनी २० ओव्हर्समध्ये १७३ धावा केल्या. त्याला प्रतुत्तर देताना बंगळुरूच्या फलंदाजांनी १७५ धावा केल्या.

राजस्थान रॉयल्सकडून यशस्वी जयस्वालने सर्वात जास्त ७५ धावा केल्या. संजू सॅमसनचा फ्लोप शो पाहायला मिळाला. त्याच्या जागी आलेल्या रियान परागने ३० धावा केल्या. शेवटच्या ओव्हर्समध्ये आलेल्या ध्रुव जुरेलने ३५ धावा करुन धावा संख्या १५० च्या पुढे नेली. दुसऱ्या बाजूला बंगळुरूचे सलामीवीर फलंदाजी करताना चांगल्या फॉर्ममध्ये दिसले. फिल सॉल्ट आणि विराट कोहलीने चांगली सुरुवात केली. दोघांनीही अर्धशतकीय खेळी केली. सॉल्टने ६५ तर कोहलीने ६२ धावा केल्या. पडिक्कलने विजयाचा शॉट मारत नाबाद ४० धावा पूर्ण केल्या.

राजस्थान रॉयल्सची प्लेईंग ११ :

यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार), नितीश राणा, रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, वानिंदू हसरंगा, जोफ्रा आर्चर, महिश तिक्षणा, संदीप शर्मा, तुषार देशपांडे

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची प्लेईंग ११ :

फिलिप सॉल्ट, विराट कोहली, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा, टीम डेव्हिड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवुड, सुयश शर्मा, यश दयाल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baaghi 4 vs The Bengal Files : टायगर श्रॉफ की पल्लवी जोशी वीकेंडला कोणी मारली बाजी? 'बागी ४'नं शनिवारी कमावले 'इतके' कोटी

Small Business Tips: Small Business सुरू करताय? 'या' महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा आणि यशस्वी बनवा

Jalna Honour Crime : आधी गळा दाबून लेकीला संपवलं, नंतर बनाव रचला, पिक्चरपेक्षाही जालन्यात भयंकर घटना

Maharashtra Live News Update: लालबागचा राजा विसर्जनासाठी समुद्रात दाखल

Ganpati Visarjan : गणपती विसर्जनाला गेलेले तीन तरुण बुडाले, एकाचा मृतदेह सापडला तर दोघे बेपत्ता

SCROLL FOR NEXT