Rajasthan Royals vs Lucknow Super Giants : IPL 2023 च्या 26व्या सामन्यात आज राजस्थान रॉयल्सचा सामना लखनऊ सुपर जायंट्सशी होणार आहे. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर हा सामना होणार आहे. सायंकाळी 7.30 वाजता हा सामना सुरु होईल. त्याआधी 7 वाजता टॉस होईल.
दोन्ही संघ गुणतालिकेत पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत. आतापर्यंत राजस्थान रॉयल्स संघाने चमकदार कामगिरी केली आहे. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्स संघ 5 पैकी 4 सामने जिंकून ८ गुणांसह गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे, तर के एल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनऊ सुपरजायंट्स संघ 5 पैकी 3 सामने जिंकून ६ गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे.
खेळपट्टीची स्थिती?
जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल मानली जाते. येथे टी-20 सामना हाय स्कोअरिंग होऊ शकतो. येथील खेळपट्टी जसजसा सामना पुढे सरकतो तसतशी फिरकीपटूंना अनुकूल होत जाते. या ठिकाणी नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. कारण गेल्या काही सामन्यांमध्ये या मैदानावर लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघांनी विजय मिळवला आहे. (Latest Sports News)
सामन्याचा अंदाज
राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायन्टस यांच्यात होणारा हा सामना अतिशय चुरशीचा होऊ शकतो. राजस्थान विजयाची हॅट्ट्रिक करून मैदानात उतरणार आहे. तर लखनऊ संघ गेल्या सामन्यात जबरदस्त विजय मिळवून सकारात्मक उर्जेने मैदानात उतरेल. परंतु संजू सॅमसनच्या संघासाठी हा एक फायदा असेल की ते घरच्या मैदानावर खेळणार आहेत. सलग तीन सामने जिंकून राजस्थानचा उत्साह उंचावला आहे. अशा स्थितीत आजच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या विजयाची शक्यता जास्त मानली जात आहे. (IPL 2023 News)
राजस्थान रॉयल्सचे संभाव्य प्लेइंग ११:
संजू सॅमसन (कर्णधार), जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, जेसन होल्डर, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा.
लखनऊ सुपर जायंट्सचे संभाव्य प्लेइंग ११:
केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डिकॉक, दीपक हुडा, कृणाल पंड्या, निकोलस पूरन, मार्कस स्टॉइनिस, आयुष बडोनी, रवी बिश्नोई, आवेश खान, मार्क वुड, युधवीर सिंग चरक.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.