या गावात हाय बैलाचं ब्युटी पार्लर... ऐकून बसला का नाय झटका... आता तुम्ही म्हणाल शर्यतीत पळणारा अन् शेतात धन्यासंग राबणारा कवा जातू का ? ब्युटी पार्लरात... पण ही 100 टक्के खरं हाय... नंदुरबारच्या बद्रीझिरा गावात हाय ह्यो ब्युटी पार्लर... त्याला म्हणत्यात इथं बुल ब्युटी पार्लर...
ओव्या म्हणत गोंड वळणाचं काम सुरु हाय या माऊलींचं ( प्ले व्हिज्युवल ) अन् दुसरीकडं गड्यांनी बैलानां आणलंय धुवायला.... त्याला म्हणत्यात क्लिनिंग... एकदम रुबाबात बरं का? आता हीच बघा की शरीर चकचकीत अन् लखलखीत दिसावं म्हणून तुपानं मालिश सुरु हाय... थोडक्यात फेशिअलच म्हणा की राव.... इकडची गंम्मत बघा.. एक गडी राजा सर्जाची तासतूय खुर अन् डोक्यावरची शिंग... जनू काय पेडिक्योअरच.... फेशिअल झालं पेडिक्योअर झालं... मग हेअर कटिंक तर का ठेवा उरकून टाका..
पोळ्याचा सण म्हजी राजा सर्जाच्या आनंदाचा दिवस... हक्काचा दिवस... गोडधोड खाण्याचा अन् रुबाबत मिरवून घेण्याचा दिवस.... मग त्यासाठी आपला बैल डॅशिंगच दिसला पाहिजी... मग तुम्ही आता वेळ दवडवू नका... चट दिशी बैल घ्या अन् गाठा नंदुरबारचं बद्रीझिरा गाव.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.