Rajasthan Royals vs Chennai Super Kings : इंडियन प्रीमियर लीग 2023 चा 37 वा लीग सामना संजू सॅमसनच्या राजस्थान रॉयल्स (RR) आणि महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज (CSK) यांच्यात झाला. जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर झालेल्या राजस्थानने चेन्नईला 32 धावांनी पराभूत करत गुणतालिकेतील आपले अव्वल पुन्हा मिळवले आहे.
या हंगामात आतापर्यंत राजस्थानने या हंगामात आतापर्यंत 8 सामने खेळले असून त्यातील 5 सामन्यात विजय मिळवाला आहे. यामुळे 10 गुणांसह आणि उत्तम नेटरनरेटच्या जोरावर राजस्थान रॉयल्स संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानी पोहोचला आहे.
या सामन्यात राजस्थानने टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने यशस्वी जैस्वालची धडाकेबाज अर्धशतकी खेळी आणि धृव जुरेल आणि देवदत्त पडीक्कलच्या तुफानी फलंदाजीच्या जोरावर निर्धारित 20 षटकात 5 बाद 202 धावां केल्या.
यशस्वीने 43 चेंडूत 77 धावांच्या खेळी केली, तर धृव जुरेलने 15 चेंडूत 34 धावा कुटल्या, त्यानंतर देवदत्त पडीक्कलनेही 13 चेंडूत 27 धावा करत संघाचा स्कोरअर 200 पार पोहचवला. यात जोस बटलने 27, शिमरॉन हेटमायरने 8 आणि आर आश्विनने एका धावाचं योगदान दिलं. चेन्नईकडून तुषार देशपांडेने 2 आणि रविंद्र जडेजाने, महिश तिक्ष्ना यांनी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
राजस्थानने दिलेल्या 203 धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना चेन्नईची सुरुवात संथ झाली. डेव्हिड कॉन्हवेने 16 चेंडूंचा सामना करून फक्त 8 धावा केल्या. अॅडम झॅम्पाच्या चेंडूवर तो बाद झाला. त्यानंतर आलेल्या अजिंक्य राहणेला देखील या सामन्यात फारशी कमाल करता आली नाही. 13 चेंडूत 15 धावा केल्यानंतर तो अश्विनचा बळी ठरला. अंबाती रायुडूला तर खातं देखील उघडता आलं नाही. तोपर्यंत एका बाजूला धुरा सांभाळणारा रुतुराज गायकवाड 29 चेंडूत 47 धावा करून बाद झाला.
मात्र त्यानतंर आलेल्या शिवम दुबे आणि मोईन अली यांनी चेन्नईच्या स्कोअरबोर्डला गती दिली. मोईन अली 12 चेंडूत 23 धावा करून झॅम्पाच्या चेंडूवर बाद झाला. यानंतर शिवम दुबे आणि रविंद्र जडेजा यांनी संघाला विजयापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना त्यात यश आलं नाही. शिवम दुबेने 52 धावा केल्या आणि रविंद्र जडेजाने 23 धावांचे योगदान दिले. परंतु चेन्नईला 32 धावांनी पराभव स्विकारावा लागला.
राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन):
यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (विकेटकीपर, कर्णधार), शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, जेसन होल्डर, अॅडम झम्पा, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल.
चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन):
रुतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर, कर्णधार), मथिशा पाथिराना, तुषार देशपांडे, महेश तिक्षना, आकाश सिंग.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.