RCB vs SRH 
Sports

RCB vs SRH: सनराइजर्सचं डोंगराएवढं आव्हान झुंजारू कार्तिकनं केलं छोटं; हैदराबादचा अवघ्या २५ धावांनी विजय

RCB vs SRH: बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर आयपीएलचा ३० वा सामना झाला. या सामन्यात हैदराबादने विजय मिळवलाय. या सामन्यात आरसीबीचा फलंदाज दिनेश कार्तिकने आपल्या खेळीने सर्वांचीच मनं जिंकली.

Bharat Jadhav

Royal Challengers Bengaluru vs Sunrisers Hyderabad : बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या हाईस्कोरिंग सामन्यात हैदरबादने २५ धावांनी विजय मिळावला. मात्र हा विजय हवा तितका मोठा ठरला नाही. हैदराबादच्या आव्हानाला कडवी झुंज दिली आरसीबीचा 'संकटमोचक' दिनेश कार्तिकने. कार्तिकने झुंजारून खेळी करत आपल्याला संघाला विजयाजवळ नेलं होतं.

या सामन्यात आरसीबीचा फलंदाज दिनेश कार्तिकने आपल्या खेळीने सर्वांचीच मनं जिंकली. कार्तिकने या सामन्यात २३ चेंडूत षटकार खेचून आपले अर्धशतक पूर्ण केलं. या सामन्यात त्याने आपल्या संघासाठी सर्वाधिक धावा केल्या आणि कडवी झुंजही दिली. या सामन्यात कार्तिकने ३५ चेंडूत ७ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने ८३ धावांची खेळी केली.

या मोसमातील त्याचे हे दुसरे अर्धशतकही ठरले. कार्तिकने ज्याप्रकारे फलंदाजी केली त्यामुळे त्याची खेळी अनेकांच्या आठवणीत राहणार आहे. या सामन्यात आरसीबीसाठी विराट कोहलीने २० चेंडूत ४२ धावांची खेळी केली, तर कर्णधार फाफ डुप्लेसिसनेही २८ चेंडूत ४ षटकार आणि ७ चौकारांच्या मदतीने ६२ धावांची खेळी केली.

आरसीबीचा कर्णधार फाफ डुप्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सनरायझर्सच्या फलंदाजांनी आपला निर्णय चुकीचा ठरवत २० षटकांत ३ बाद २८७ धावा केल्या.आयपीएलच्या इतिहासातील ही सर्वात मोठी धावसंख्या आहे. सनरायझर्सने त्यांचाच विक्रम मोडलाय. हैदराबादने २० दिवसांपूर्वी २७ मार्चला मुंबई इंडियन्सविरुद्ध २७७ धावा केल्या होत्या.

२८८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबी संघाने शेवटपर्यंत झुंज दिली. दिनेश कार्तिकने झुंजार खेळी करत संघाला विजया जवळ नेले. त्याच्या दमदार खेळीमुळे संघाने अवघ्या २५ धावांनी सामना गमावला. दिनेश कार्तिकने आरसीबीची मान वाचवली. या सामन्यात दोन्ही संघांनी मिळून एकूण ५४९ धावा केल्या.

आयपीएलमधील एका सामन्यातील या सर्वाधिक धावा आहेत. यापूर्वी याच मोसमात सनरायझर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात झालेल्या सामन्यात एकूण ५२३ धावा झाल्या होत्या. दरम्यान या विजयानंतर सनरायझर्सचे पॉइंट टेबलमध्ये आता ८ गुण झालेत. सहा सामन्यांमधला त्यांचा चौथा विजय असून ते पॉइंट टेबलमध्ये चौथ्या स्थानावर कायम आहेत. दुसरीकडे आरसीबीला ७ सामन्यांमध्ये सहाव्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. गुणतालिकेत तो तळाच्या १०व्या स्थानावर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT