RCB vs LSG  x
Sports

RCB vs LSG : मयंक यादव ठरला आरसीबीचा 'कर्दनकाळ'; घरच्या मैदानात बेंगळुरुचा २८ धावांनी पराभव

RCB vs LSG : आयपीएलच्या १५ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाला लखनऊ सुपर जायंट्सकडून पराभव स्वीकारावा लागला. आपल्याच घरच्या मैदानात आरसीबीला २८ धावांनी पराभव स्वीकारावा लागलाय. बेंगळुरू संघाचा ४ सामन्यांमधला हा तिसरा पराभव आहे

Bharat Jadhav

Royal Challengers Bengaluru vs Lucknow Super Giants :

आयपीएलच्या १५ वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू लखनऊ सुपर जायंट्समध्ये झाला. लखनऊ सुपरजायंट्स संघाने दिलेल्या १८२ धावांचा पाठलाग करताना बेंगळुरू संघाच्या नाकीनऊ आले. अख्खा संघ फक्त १५३ धावा करू शकला. लखनऊ सुपर जायंट्सने बेंगळुरू संघाला त्यांच्या घरच्या मैदानात २८ धावांनी पराभूत केलं. लखनऊच्या या विजयाचा हिरो ठरला वेगवान गोलंदाज मयंक यादव. मयंकने १४ धावा देत ३ बळी घेतले. बेंगळुरू संघाचा ४ सामन्यांमधला हा तिसरा पराभव आहे.तर लखनऊने ३ सामन्यात दुसरा विजय नोंदवला. (Latest News)

एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने नाणेफेक जिंकली. कर्णधार फाफ डू प्लेसिसने प्रथम गोलंदाजी निवडत लखनऊ सुपर जायंट्स संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं.लखनऊ य संधीचा फायदा घेत बेंगळुरू समोर २० षटकांत ५ विकेट गमावत १८१ धावा करत १८२ धावांचे आव्हान ठेवले. आरसीबीकडून ग्लेन मॅक्सवेलने २३ धावा देत २ विकेट घेतल्या. रीस टॉपले, यश दयाल आणि मोहम्मद सिराज यांनी १-१ बळी घेतला.

लखनऊने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना बेंगळुरु संघाची पूर्ण शक्ती पणाला लागली, परंतु आरसीबीला धावांचा डोंगर पार करता आला नाही. बेंगळुरूचा अख्खा संघ फक्त १५३ धावा करू शकला. आरसीबीकडून फलंदाजी करताना महिपाल लोमररने १३ चेंडूत सर्वाधिक ३३ धावा केल्या. रजत पाटीदारने २९ आणि विराट कोहलीने २२ धावा केल्या. लखनऊकडून गोलंदाजी करताना मयंक यादवने ३ विकेट घेतल्या. त्यानंर नवीन उल हकने २ बळी घेतले.मार्कस स्टॉइनिस आणि मणिमरन सिद्धार्थने १-१ विकेट घेतल्या.

प्रथम फलंदाजी करताना लखनऊ सुपरजायंट्सच्या सलामीवीर केएल राहुल आणि क्विंटन डीकॉकने चांगली सुरुवात केली. दोघांनी मिळून ५३ धावा जोडल्या. केएल राहुल २० धावा करत माघारी परतला. क्विंटन डीकॉकने ५६ चेंडूत तुफानी खेळी करत ८ चौकार आणि ५ षटकारा मारत ८१ काढल्या. त्यानंतर मार्कस स्टोइनिसने २४ धावांचे बहुमुल्य योगदान दिलं. या दोघा-तिघांच्या फलंदाजीनंतर निकोसल पुरनने धमाकेदार फलंदाजी करत लखनऊच्या प्रेक्षकांना दिलखुलास आनंद दिला. पुरनने या डावात २१ चेंडूंचा सामना करत ४० धावांची खेळी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींचा हप्ता लांबणीवर जाणार; जानेवारीत खात्यात ₹४५०० जमा होण्याची शक्यता

Panchag Today: आजचा दिवस बदल घडवणारा! या 4 राशींवर नशीब होणार मेहरबान

Maharashtra Live News Update: मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी

Manikrao Kokate Arrest Update: माणिकराव कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रूग्णालयात, पण...

Maharashtra Politics : कल्याणमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! 'या' बड्या नेत्याने घेतलं धनुष्यबाण हाती

SCROLL FOR NEXT