rohit sharma virat kohli may open the innings in t20 world cup says reports amd2000 twitter
Sports

T20 WC 2024: रोहित - विराट सलामीला, तर या फलंदाजांचा पत्ता कट! T-20 WC साठी काय आहे BCCI चा मास्टरप्लान

BCCI Plan For T20 World Cup 2024: आयपीएल २०२४ स्पर्धा झाल्यानंतर आयसीसी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. ही स्पर्धा वेस्टइंडीज आणि अमेरिकेत रंगणार आहे.

Ankush Dhavre

आयपीएल २०२४ स्पर्धा झाल्यानंतर आयसीसी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. ही स्पर्धा वेस्टइंडीज आणि अमेरिकेत रंगणार आहे. या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर कर्णधार रोहित शर्मा, हेड कोच राहुल द्रविड आणि अजित आगरकर यांच्यात बैठक पार पडली. या बैठकित काही महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली आहे.

माध्यमातील वृ्त्तानुसार रोहित शर्मासोबत विराट कोहलीला डावाची सुरुवात करण्याची संधी दिली जाऊ शकते. विराट कोहली हा मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करतो. मात्र तो जर सलामीला येत असेल, तर यशस्वी जयस्वालचा पत्ता कट होऊ शकतो. तर शुभमन गिलला बॅकअप ऑप्शन म्हणून ठेवण्याचा विचार सुरु आहे. कसोटीत दमदार खेळ करणारा यशस्वी जयस्वाल आयपीएल २०२४ स्पर्धेत फ्लॉप ठरला आहे. त्याला ७ सामन्यांमध्ये अवघ्या १२१ धावा करता आल्या आहेत.

रियान परागला संधी मिळणार?

आयपीएल २०२४ स्पर्धेत आणखी एक गाव तुफान गाजतंय ते म्हणजे रियान पराग. गेले काही वर्ष सातत्याने फ्लॉप ठरत असलेल्या या खेळाडूने देशांतर्गत क्रिकेटमध्ये आणि आयपीएल २०२४ स्पर्धेत दमदार कमबॅक केलं आहे. आतापर्यंत खेळलेल्या ७ सामन्यांमध्ये त्याने ३१८ धावा केल्या आहेत. त्याला भारतीय संघात स्थान मिळणार असल्याची चर्चा सुरु आहे. मात्र याबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

हार्दिक पंड्याला संधी मिळणार का?

हार्दिक पंड्याला देखील या हंगामात नावाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. तो गोलंदाजीत आणि फलंदाजीत पूर्णपणे फ्लॉप ठरतोय. चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने गोलंदाजी करताना ४३ धावा खर्च केल्या. तर फलंदाजीत २ धावा केल्या. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात २१ आणि हैदराबादविरुद्ध खेळताना त्याने अवघ्या २४ धावा केल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Neechbhang Rajyog 2025: आज शुक्र बनवणार शुक्रादित्य नीचभंग राजयोग; 'या' 3 राशींच्या घरी बरसणार पैसा

Maharashtra Live News Update : सांगली-मिरजला पावसाने झोडपले,

Lucky zodiac signs: गुरुवारी रेवती नक्षत्राचा प्रभाव; जाणून घ्या शुभ मूहूर्त, कोणत्या राशींवर बृहस्पतीची कृपा

Solapur : ऐन दिवाळीत दिवाळे! महाराष्ट्रातील या बँकेवर RBI चे कठोर निर्बंध, पैशांचं काय होणार?

Housing Society Elections : गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणूका ऑनलाइन होणार; सरकारनं नेमका काय निर्णय घेतलाय? VIDEO

SCROLL FOR NEXT