rohit sharma  twitter
क्रीडा

IND vs SL: श्रीलंकेविरोधात पहिला वनडे टाय, रोहित शर्मा निराश, म्हणाला ती एक धाव...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Rohit Sharma Reaction : भारत आणि श्रीलंका यांच्यातील (IND vs SL) पहिला वनडे सामना टाय झाला. श्रीलंकेने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाने शानदार सुरुवात केली होती. पण मधल्या फळीतील फलंदाजांनी केलेल्या हाराकिरीमुळे भारताला फटका बसला. कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) अर्धशतक ठोकत सामना एकहाती फिरवला होता, पण रोहित बाद झाल्यानंतर भारतीय संघाने सातत्याने विकेट फेकल्या. परिणामी हा सामना बरोबरीत सुटला. भारतीय संघाच्या (Team India) निराशाजनक कामगिरीनंतर रोहित शर्मा (Rohit Sharma Reaction) निराश दिसला. रोहित शर्मा म्हणाला की, १४ चेंडूमध्ये फक्त एक धाव करायची होती. शेवटी निराशाच हातात आली.

रोहित शर्मा काय म्हणाला.... (Rohit Sharma Reaction)

आर प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या सामन्यात श्रीलंकेच्या गोलंदाजांनी (ind vs sl 1st odi) शानदार कमबॅक करत सामना बरोबरीत सोडवला. सामना टाय झाल्यानंतर रोहित शर्मा निराश दिसला. सामन्यानंतर बोलताना रोहित शर्मा (Rohit Sharma) म्हणाला, " श्रीलंकेनं दिलेले हे आव्हान करण्यासारखं होतं. धावांचा पाठलगा करताना चांगली फलंदाजी करावी लागेल. आम्ही त्या त्या टप्प्यामध्ये चांगली फलंदाजी केली. पण संपूर्ण सामन्यात आमच्यासाठी सातत्य नव्हते. आमची सुरुवात चांगली झाली पण 10 षटकांनंतर फिरकीपटूंनी शानदार मारा केला. नंतर आम्ही काही विकेट गमावल्या आणि खेळात मागे पडलो."

कमबॅक कुठे केलं?

भारतीय कर्णधार रोहित शर्मा पुढे म्हणाला, "केएल राहुल आणि अक्षर पटेल यांच्या भागीदारीमुळे पुन्हा एकदा सामन्यात कमबॅक केलं. पण अखेरीस थोडी निराशाजनक कामगिरी झाली. कारण 14 चेंडू, 1 धाव आवश्यक होती. क्रिकेटमध्ये अशा गोष्टी घडतात. श्रीलंकेने चांगला खेळ केला."

रोहित शर्मा पुढे म्हणाला, " श्रीलंकेतील खेळपट्ट्यावर मोठी फटकेबाजी करता येऊ शकते, धावा काढता येतात. पण येथे धावा काढण्यासाठी खरोखर चांगले प्रयत्न करावे लागतील. आम्ही ज्या प्रकारे शेवटपर्यंत लढलो त्याचा अभिमान आहे. सामना पुढे गेला. दोन्ही संघांनी संयम राखणे आणि खेळात टिकून राहणे महत्त्वाचे होते. १४ चेंडूमध्ये एक धाव निघायला हवी होती. पण खेळात या गोष्टी होतच राहतात."

पहिला वनडे सामना टाय -

श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. श्रीलंकेची सुरुवात अतिशय खऱाब झाली. श्रीलंकेनं प्रथम फलंदाजी करताना २३० धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरदाखल भारतीय संघाने शानदार सुरुवात केली. रोहित शर्माने अर्धशतक ठोकत सामना भारताच्या बाजूने फिरवला. पण रोहित शर्मा तंबूत परतल्यानंतर भारताची फलंदाजी ढेपाळली. एकाही फलंदाजला मोठी खेळी करता आली नाही. भारतीय संघ २३० धावांपर्यंतच मजल मारु शकला. सामना बरोबरीत सुटला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT