rohit sharma twitter
Sports

Rohit Sharma Statement: संघाची निवड करताना रोहितकडून मोठी चूक? सामन्यानंतर केला मोठा खुलासा

Rohit Sharma News In Marathi: भारत आणि आयर्लंडविरुद्ध झालेल्या सामन्यात भारतीय संघाने शानदार कामगिरी करत विजय मिळवला.

Ankush Dhavre

भारतीय संघाने टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेचा शानदार विजयाने श्रीगणेशा केला आहे. भारतीय संघाचा पहिला सामना आयर्लंडविरुद्ध पार पडला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करत असताना आयर्लंडचा डाव ९६ धावांवर आटोपला. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने ८ गडी राखून विजय मिळवला. हा सामना न्यूयॉर्कच्या नासाऊ काऊंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये पार पडला.

या सामन्यात वेगवान गोलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला. केवळ भारतीय संघातील गोलंदाज नव्हे तर, आयर्लंडच्या वेगवान गोलंदाजांनीही भारतीय संघातील फलंदाजांच्या अडचणीत वाढवल्या. त्यामुळे रोहित शर्माचं गणित चुकलं की काय? असं चित्र दिसून येत आहे.

वेगवान गोलंदाजांनी शानदार कामगिरी केल्यानंतर रोहित शर्मा म्हणाला की, आम्ही ४ फिरकी गोलंदाजांना खेळवावं असं मला मुळीच वाटत नाहीये. भारतीय संघाने टी -२० वर्ल्डकपसाठी निवडलेल्या संघात ४ फिरकी गोलंदाज आणि ३ वेगवान गोलंदाजांना संधी दिली आहे. टी -२० वर्ल्डकपसाठी रवाना होण्यापूर्वी भारतीय कर्णधार रोहित शर्मा म्हणाला होता की, आम्हाला टी -२० वर्ल्डकपसाठी ४ फिरकी गोलंदाज हवे आहेत.

मात्र आता न्यूयॉर्कची खेळपट्टी पाहिली तर, ती वेगवान गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरत आहे. त्यामुळे रोहितचा अंदाज चुकल्याचं दिसून येत आहे. दरम्यान भारतीय संघाचे सुपर ८ चे सामने वेस्टइंडिजमध्ये होणार आहेत. तिथे फिरकी गोलंदाज भारतीय संघासाठी ट्रम्पकार्ड ठरू शकतात.

काय म्हणाला रोहित शर्मा?

सामन्यानंतर बोलताना रोहित म्हणाला की, 'इथे ४ फिरकी गोलंदाज खेळवता येतील असं मला मुळीच वाटत नाहीये. ज्यावेळी आम्ही संघाची निवड केली होती. त्यावेळी आम्हाला संतुलित संघ हवा होता. इथे परिस्थिती वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल आहे. फिरकी गोलंदाजांची भूमिका यापुढे महत्वाची असणार आहे. आजची खेळपट्टी ही ४ वेगवान गोलंदाजांना स्थान देण्यासाठी अनुकूल होती. आम्ही २ फिरकी गोलंदाजांना खेळवलं जे अष्टपैलू खेळाडू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे जिल्ह्यातील घाट माथ्यावर जोरदार पाऊस

Rain Alert : राज्यात मुसळधार पाऊस धुमाकूळ घालणार! ३१ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता; IMD चा मोठा अलर्ट

Building Collapse : भिवंडी हादरली! ४ मजली इमारत पत्त्यांसारखी कोसळली; दोघांचा मृत्यू, ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची भीती

PM modi Video : पेपर लीकप्रकरणी पंतप्रधान मोदींचा व्हिडिओ मेसेज, घोटाळेबाजांना कडक इशारा

Today's Horoscope : 'या' ६ राशींसाठी शु्क्रवार अत्यंत भाग्यशाली! अचानक होणार धनलाभ? पाहा तुमचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT