भारतीय संघाने आयसीसी वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत दमदार कामगिरी केली होती. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने या स्पर्धेतील सलग १० सामन्यांमध्ये विजय मिळवला होता. भारतीय संघाला वर्ल्डकप ट्रॉफी जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानलं जात होतं. मात्र १९ नोव्हेंबर रोजी झालेल्या फायनलमध्ये भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. यासह कोट्यवधी क्रिकेट चाहत्यांचं हृदय तुटलं होतं. दरम्यान या स्पर्धेबाबत बोलताना रोहित शर्मा भावुक झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
भारतीय संघ सध्या टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धा खेळण्यासाठी न्यूयॉर्कमध्ये आहे. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने आयर्लंडचा धुव्वा उडवत विजयी सलामी दिली आहे. दरम्यान भारतीय संघाचा पुढील सामना ९ जून रोजी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मा अजूनही वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील फायनलमध्ये झालेला पराभव विसरु शकलेला नाही.
आदिदास इंडियाला दिलेल्या मुलाखतीत रोहित शर्मा म्हणाला की, ' वनडे वर्ल्डकपची फायनल झाल्यानंतर ज्यावेळी दुसऱ्या दिवशी मी उठलो, त्यावेळी काल रात्री काय झालंय हे मला माहितंच नव्हतं. त्यावेळी मी माझ्या पत्नीसोबत चर्चा करत होतो. त्यावेळी मी तिला म्हणालो की, काल रात्री जे झालं ते वाईट स्वप्न होतं ना? मला असं वाटतंय उद्या फायनल आहे. मला विश्वासच बसत नव्हता की, आम्ही पराभूत झालो आहे. पुढच्या संधीसाठी आता ४ वर्ष वाट पाहावी लागणार आहे.'
या संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघाने चॅम्पियनसारखा खेळ केला होता. सुरुवातीचे सलग १० सामने जिंकत भारतीय संघाने फायनलमध्ये प्रवेश केला होता. या सामन्यात भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाला पराभूत करत जेतेपदावर नाव कोरलं होतं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.