Video of conversation between Rohit Sharma and Ritika Sajdeh in the stadium during T-20 World Cup final went viral. saam tv
Sports

भरमैदानात रोहित शर्माचं बायकोसोबत भांडण; स्टेडियमवरच रितिकाची वटवट, हिटमॅनचा चेहरा पडला | Video Viral

Rohit Sharma And Ritika Fight: टीम इंडियाने न्युझीलंडच्या संघाचा पराभव करत तिसऱ्यांदा टी२० वर्ल्ड कप जिंकला. भारतीय संघाचा अंतिम सामना पाहण्यासाठी अनेक भारतीय दिग्गज खेळाडूंनी हजेरी लावली होती. हिटमॅन रोहित शर्मा सुद्धा आपल्या पत्नी रितिकासह आला होता, त्यावेळी मात्र त्यांच्यात जोरदार भांडण झालं.

Bharat Jadhav

  • टी-२० वर्ल्ड कप फायनलदरम्यान रोहित शर्मा आणि रितिका सजदेह यांचा व्हिडिओ व्हायरल.

  • दोघेही मैदानाच्या सीमेजवळ बोलताना आणि थोडा वाद घालताना दिसले.

  • रितिका सतत बोलताना दिसते, तर रोहित नाराज दिसत आहे.

यंदाच्या टी-२० विश्वचषकात न्यूझीलंडला हरवत भारताने ऐतिहासिक विजय मिळवला. सलग दुसऱ्यांदा विश्वविजेता बनल्याने टीम इंडियाचे खेळाडू मैदानावर आनंद साजरा करत होते. आनंदाने नाचत गात होते. किक्रेट चाहतेही आनंदाने नाचत गात होते. पण याच दरम्यान रोहित शर्मा आणि त्याची पत्नी रितिका सजदेह यांचा एक छोटासा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात दोघेही एकमेकांशी वाद घालताना दिसत आहेत.

दोघांमध्ये जोरदार भांडण झाले असल्याचं दिसत आहे. व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांकडून भन्नाट प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. या व्हिडिओमध्ये दोघेही मैदानाच्या सीमेजवळ उभे आहेत. एकमेकांशी गप्पा मारताना दिसत आहेत. रितिका सतत बोलताना दिसतेय. रोहितचा हात पकडत त्याला राजी करण्याचा प्रयत्न करतेय. पण रितिकाच्या आधीच्या बोलण्यामुळे रोहित शर्मा कमालीचा रागावलेला दिसतोय.

सर्वजण विश्वचषक जिंकण्याचा आनंद साजरा करत आहेत, दुसरीकडे रोहित शर्मा आणि त्याची पत्नी हे एकमेकांशी वाद घालत भांडताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये रितिका रागाने काहीतरी बोलताना दिसतेय. त्यावर रोहित खूपच नाराज झाला असून तो तिच्याकडे पाहत सुद्धा नाही. परंतु त्यांच्यात कशावरून वाद सुरू होता हे व्हिडिओमधून ऐकू येत नाहीये.

दरम्यान काही वेळेने रितिका सजदेह हसताना दिसतेय. दोघांमध्ये वाद झालाय असा कोणताही अधिकृत दावा आम्ही करत नाही आहोत. स्टेडियमवरील आवाजामुळे रितिका रोहितशी मोठ्या आवाजात बोलत होती. कारण रितिका नंतर हसताना बोलताना दिसते.

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोक त्यावर मजेदार कमेंट करत आहेत.एका युझरने लिहिले, "ते कशावरून भांडत आहेत?" काही म्हणतात, “विजयानंतर पत्नीला नेहमीच तडजोड करावी लागते”, तर काही म्हणतात, “रोहितच्या चेहऱ्यावर राग, पण रितिकाचे हास्य सर्वकाही शांत करते.”

एकाने लिहिले, "महिला दिनी, तुम्हाला दिवसभर महिलांचे ऐकावे लागेल, तुम्हाला घाबरून राहावे लागेल, भाऊ." एकाने लिहिले की, "कुटुंबात हे छोटे-मोठे वाद होतच राहतात." दुसऱ्याने लिहिले की, "वहिनीसाहेब रोहित भाऊला धाक दाखवत आहेत."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : बच्चू कडू यांनी आंदोलन केलं म्हणून आम्ही कर्जमाफीचा निर्णय घेतला- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Auto Rickshaw Permits : परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा मोठा निर्णय! नवीन रिक्षा परवान्यांना स्थगिती; नेमकं कारण काय?

महाराष्ट्राला मिळाले ७ नवीन खासदार, कोण कोण दिसणार संसदेत? VIDEO

PMC Budget 2026: पुणे महापालिकेचं १३ हजार कोटींचं अंदाजपत्रक, पुणेकरांना काय नवीन सुविधा मिळणार?

Sun Tan Removal Tips: उन्हामुळे चेहरा काळा पडलाय? मग घरीच करा हे 5 सोपे उपाय

SCROLL FOR NEXT