Rohit Sharma saam tv
Sports

Rohit Sharma: रोहित शर्माच्या निवृत्तीचं गूढ वाढलं; 'अंदर की बात' अखेर समोर, चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर 'असं' घडण्याची शक्यता

Champions Trophy: चॅम्पियन्स ट्रॉफीतील न्यूझीलंडच्या फायनलबाबत भारतीय क्रिकेट चाहते काहीसे टेन्शमध्ये आहेत. याचं कारण म्हणजे टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा या सामन्यानंतर निवृत्तीची घोषणा करू शकतो.

Surabhi Jayashree Jagdish

क्रिकेट प्रेमींना ज्या दिवसाची उत्सुकता होती तो दिवस आता आला आहे. आज दुबईच्या मैदानावर भारत विरूद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये फायनल सामना रंगणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीतील न्यूझीलंडच्या फायनलबाबत भारतीय क्रिकेट चाहते काहीसे टेन्शमध्ये आहेत. याचं कारण म्हणजे टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा या सामन्यानंतर निवृत्तीची घोषणा करू शकतो. रोहितबद्दल सातत्याने प्रश्न विचारले जातायत. दरम्यान असं असलं तरीही रोहित पुढे खेळण्याचा निर्णय घेईल की नाही हे अद्याप ठरलेलं नाही.

आगरकर करणार रोहितशी चर्चा

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर रोहित निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांच्याशी वनडे क्रिकेटमधील भवितव्याबाबत चर्चा करण्याची शक्यता आहे. भारतीय क्रिकेटमध्ये असं दिसून आलंय की, निवड समिती कोणत्याही मोठ्या खेळाडूचं भवितव्य ठरवत नाही, तर खेळाडू स्वत: बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी याबाबत बोलतात.

प्रेस कॉन्फ्रेंसमध्येही रोहित दिसला नाही

भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली तर कर्णधार रोहित निवृत्तीची घोषणा करू शकतो. पण फायनलपूर्वी तो निवृत्तीशी संबंधित प्रश्न टाळण्यासाठी पत्रकार परिषदेला उपस्थित नव्हता. रोहितच्या जागी उपकर्णधार शुभमन गिलने माध्यमांशी संवाद साधला. यावेळी गिलने ड्रेसिंग रूममध्ये कोणत्याही खेळाडूच्या निवृत्तीबाबत चर्चा नसल्याचं स्पष्टही केलं.

रोहित-कोहली घेणार का निवृत्ती?

कोहली आणि रोहित एकत्र वनडेतून निवृत्ती घेणार नाहीत हे निश्चित आहे. टी-२० वर्ल्डकपनंतर असं घडले कारण त्या फॉरमॅटमध्ये त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर या दोन्ही खेळाडूंना अजून काही साध्य करायचं नव्हतं. इतर फॉरमॅटमध्ये म्हटलं तर कोहलीची नजर टेस्ट क्रिकेटमध्ये १०००० धावा पूर्ण करण्यावर असणार आहे.

इंग्लंड दौऱ्यावर भासणार गरज

कोहली टेस्ट क्रिकेटपटू म्हणून खेळणार हे निश्चित असून यंदाच्या इंग्लंड दौऱ्यात त्याची गरज भासणार आहे. पण ऑस्ट्रेलिया दौऱ्यात चांगल्या फॉर्ममध्ये नसल्यामुळे सिडनीमध्ये खेळल्या गेलेल्या शेवटच्या टेस्ट सामन्यातून बाहेर पडलेला रोहित काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

SCROLL FOR NEXT