rohit sharma saam tv news
Sports

IND vs ENG 3rd Test: राजकोट कसोटीपूर्वी टीम इंडियासमोर ३ मोठे प्रश्न! रोहितला उत्तर शोधणं गरजेचं

India vs England Rajkot Test: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील तिसरा कसोटी सामना येत्या १५ फेब्रुवारीपासून राजकोटच्या मैदानावर रंगणार आहे.

Ankush Dhavre

India vs England 3rd Test:

भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील तिसरा कसोटी सामना येत्या १५ फेब्रुवारीपासून राजकोटच्या मैदानावर रंगणार आहे. या मालिकेतील उर्वरीत ३ कसोटी सामन्यांसाठी अजूनही भारतीय संघाची घोषणा करण्यात आलेली नाही. सध्या ही मालिका १-१ च्या बरोबरीत आहे.

मालिका जिंकण्यासाठी भारतीय संघाला येणाऱ्या कसोटीत विजय मिळवणं गरजेचं असणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी कर्णधार रोहित शर्माला ३ प्रश्नांची उत्तर शोधून काढावी लागणार आहेत.

शतकीय भागीदारी...

मालिकेतील पहिला कसोटी सामना हैदराबादच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यत ३ असे फलंदाज होते ज्यांनी ८० पेक्षा अधिक धावा केल्या. मात्र एकही जोडी १०० पेक्षा अधिक धावांची भागीदारी करु शकली नाही. श्रेयस अय्यर आणि यशस्वी जयस्वाल या दोघांनी मिळून ९० धावा जोडल्या होत्या.

मध्यक्रमात बदल?

भारतीय संघाचा मध्यक्रम कमकुवत असल्याचं दिसून आलं आहे. मालिकेतील दुसऱ्या कसोटीतील पहिल्या डावात ३९६ धावा केल्या होत्या. यादरम्यान भारतीय संघाकडून यशस्वी जयस्वालने सर्वाधिक २०९ धावांची खेळी केली होती.मात्र तरीदेखील एकही जोडी मिळून १०० धावा जोडू शकली नव्हती. मध्यक्रमात रजत पाटीदार ३२, अक्षर पटेल २७,श्रेयस अय्यर २७ आणि केएस भरत अवघ्या १७ धावा करत माघारी परतला होता. त्यामुळे भारतीय संघाला मध्यक्रम भक्कम करावाच लागेल. (Cricket news in marathi)

फ्लॉप खेळाडूंना दिली जातेय संधी..

केएस भरत आणि श्रेयस अय्यर हे दोघेही सुरुवातीच्या कसोटी सामन्यांमध्ये पूर्णपणे फ्लॉप ठरले आहेत. हैदराबाद कसोटीत अय्यरने ३५ आणि १३ धावा केल्या. तर विशाखापट्टनम कसोटीत तो २७ आणि २९ धावा करत माघारी परतला. तर दुसरीकडे भरत हैदराबाद कसोटीत ४१ आणि २८ धावा करत माघारी परतला. तर दुसऱ्या कसोटीत १७ आणि ६ धावा करत माघारी परतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sitaare Zameen Par Collection: बॉक्स ऑफिसवर चमकले आमिर खानचे नशिब; गुरुवारी केली इतक्या कोटींची कमाई

Maharashtra Live News Update: अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या झाडाझडतीत एकाकडे सापडली पिस्तुल

पँटची चैन उघडली अन्..., ट्रेनमध्ये तरुणीकडे पाहून तरुणाचं अश्लील कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल राग

Fake Charger: मोबाईल चार्जर खरे आहे का बनावट? खरेदी करताना ‘हे’ तपशील नक्की तपासा

Deepika Padukone Fitness: प्रेग्नेसीनंतर दीपिका पादुकोण इतकी फिट कशी? पाहा आताचे नवीन फोटो

SCROLL FOR NEXT