rohit sharma twitter
Sports

IND vs AUS 5th Test : कर्णधार Rohit Sharma प्लेइंग XI मधून बाहेर? गौतम गंभीरने स्पष्ट सांगितलं

India vs Australia 5th Test, Gautam Gambhir On Rohit Sharma: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या शेवटच्या कसोटीत रोहित शर्मा असणार की नाही? याबाबत गौतम गंभीरने मोठं वक्तव्य केलं आहे.

Ankush Dhavre

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेली कसोटी मालिका सध्या शेवटच्या टप्प्यात आहे. मालिकेतील शेवटचा कसोटी सामना सिडनीच्या मैदानावर रंगणार आहे. या सामन्याच्या एक दिवसाआधी भारताचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने पत्रकार परिषद घेतली.

या पत्रकार परिषदेत, त्याने अनेक महत्वाच्या प्रश्नांची उत्तरं दिली. दरम्यान प्लेइंग ११ बाबतही मोठा खुलासा केला आहे.

रोहित सिडनी कसोटीत बाहेर बसणार?

सिडनी कसोटीच्या एक दिवसाआधी, पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने हजेरी लावली. मात्र रोहित शर्मा पत्रकार परिषदेसाठी आला नाही. त्यामुळे गौतम गंभीरला रोहित शर्माबाबत प्रश्न विचारण्यात आला.

कसोटी सामन्याच्या एक दिवसाआधी संघाचा कर्णधार पत्रकार परिषदेसाठी येत असतो. रोहित या पत्रकार परिषदेसाठी का आला नाही? या प्रश्नाचं उत्तर देताना, गंभीर म्हणाला, ' रोहित ठिक आहे. कर्णधार पत्रकार परिषदेत येणं ही पंरपरा नाही. मुख्य प्रशिक्षक आहे.'

रोहितला प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळणार का?

रोहित शर्मा हा संघाचा कर्णधार आहे. तरीदेखील त्याला प्लेइंग ११ मध्ये संधी मिळणार का? असा प्रश्व विचारण्यात आला, या प्रश्नाच उत्तर देताना गंभीर म्हणाला, ' जसं की मी म्हणालो, आम्ही आधी विकेट पाहणार आणि मग ठरवणार.' रोहित प्लेइंग ११ मध्ये असणार की नाही, याबाबत गंभीरने कुठलीही हिन्ट दिलेली नाही. त्यामुळे गंभीर आणि रोहित यांच्यात काहीच ठिक नसल्याचं चित्र दिसून येत आहे.

रोहित शर्मा वैयक्तिक कारणामुळे पहिला कसोटी सामना खेळताना दिसून आला नव्हता. मात्र दुसऱ्या कसोटीतून त्याने कमबॅक केलं. या मालिकेतील ३ सामन्यांमध्ये फलंदाजी करताना त्याला हवी तशी कामगिरी करता आलेली नाही.

आतापर्यंत त्याला अवघ्या ३१ धावा करता आल्या आहेत. त्याची ही फ्लॉप कामगिरी पाहता, त्याला संघाबाहेर करण्याची मागणी जोर धरु लागली आहे. आता त्याला शेवटच्या कसोटीसाठी संघात स्थान मिळणार की नाही, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT