Rohit Sharma And Hardik Pandya saam tv
Sports

रोहित शर्मा, हार्दिक पंड्याला अल्टिमेटम; भारतीय संघात सिलेक्शनसाठी १ अट पूर्ण करावी लागणार

India vs Afghanistan ODI Series Rohit Sharma and Hardik Pandya update : आगामी वनडे मालिकेत टीम इंडियात रोहित शर्मा, हार्दिक पंड्याची निवड होणार का याबाबत प्रश्नचिन्ह आहे. त्यात आता बीसीसीआयने या दोन्ही खेळाडूंना अट घातली आहे.

Nandkumar Joshi

आयपीएलच्या धमाक्यानंतर आता भारतीय संघ अफगाणिस्तानविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. या मालिकेत स्टार फलंदाज रोहित शर्मा आणि स्टार ऑलराउंडर हार्दिक पंड्या खेळणार का, याबाबत साशंकता आहे. फिटनेस सिद्ध केल्यानंतरच टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये निवड शक्य होईल, असा स्पष्ट संदेश बीसीसीआयने या दोघांना दिल्याचे वृत्त आहे. आज तकच्या वृत्तानुसार, भारतीय संघाच्या अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान निश्चित करायचे असेल तर, त्याआधी सेंटर ऑफ एक्सीलेन्स (CoE) मधून फिटनेस क्लिअरन्स घ्यावा लागेल, असे दोघांना सांगण्यात आल्याचे कळते.

हार्दिक पंड्या याला अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. त्याचं नाव संघात असलं तरी त्याला फिटनेससंबंधी अट पूर्ण करावी लागणार आहे. रिपोर्टनुसार, हार्दिक २ जूनला बेंगळुरूतील सेंटर ऑफ एक्सीलेन्समध्ये पोहोचला आहे. या मालिकेपूर्वी तो सेंटरमध्ये आठवडाभरापेक्षा अधिक काळ असणार आहे.

या कालावधीत हार्दिक पंड्याला फिटनेस ड्रिल, फिजिकल असेसमेंट पूर्ण करावं लागणार आहे. कसोटीला खरा उतरल्यानंतर रिटर्न टू प्लेसाठी मंजुरी मिळणार आहे. यानंतर अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेत त्याच्या समावेशाबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असे समजते.

हार्दिक पंड्यासाठी ही फिटनेस टेस्ट खूप महत्वाची ठरणार आहे. कारण आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाची जबाबदारी असताना पाठिच्या दुखण्यानं डोकं वर काढलं होतं. त्यामुळे त्याला स्पर्धेतील काही सामन्यांना मुकावे लागले होते. तसेच हार्दिक अखेरचा वनडे सामना आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता.

रोहित शर्माचीही लागणार कसोटी

हार्दिक पंड्याच नव्हे तर, माजी कर्णधार रोहित शर्मा याला देखील बीसीसीआयने सेंटर ऑफ एक्सीलेन्समध्ये रिपोर्ट करण्यास सांगितले आहे. रोहित शर्मा याला देखील आयपीएलवेळी दुखापतीला सामोरे जावे लागले होते. अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी जाहीर केलेल्या संघात रोहित शर्माचं देखील नाव आहे. मात्र, प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान निश्चित करण्यासाठी फिटनेस टेस्टला सामोरे जावे लागणार आहे.

परंतु, रोहित शर्मा हा फिट आहे, असा दावा अलीकडेच मुंबई इंडियन्सचा हेड कोच महेला जयवर्धने याने केला आहे. दुखापतीतून सावरण्यासाठी रोहित शर्माला पुरेसा वेळ दिला आणि मेडिकल टीमने तो १०० टक्के फिट असल्याचे सांगितले आहे. रोहित शर्मा मुंबई इंडियन्सकडून इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळला तो संघाच्या रणनीतीचा भाग होता. त्याचा फिटनेसशी काहीही संबंध नव्हता, असंही त्यानं स्पष्ट केलं.

भारत विरुद्ध अफगाणिस्तान वनडे मालिका कधीपासून?

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात वनडे मालिका होणार आहे. तीन सामन्यांची ही मालिका असून, १३ जूनला पहिला सामना धर्मशाला येथे खेळवला जाईल. दुसरा सामना १७ जूनला लखनऊच्या इकाना स्टेडियममध्ये होईल. तर २० जूनला चेन्नईत तिसरा सामना होईल.

भारताचा एकदिवसीय संघ -

शुभमन गिल (कॅप्टन), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, इशान किशन, हार्दिक पंड्या, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, प्रिन्स यादव, गुरनूर बरार, हर्ष दुबे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: गांजाची नशा डोक्यात गेली; प्रायव्हेट पार्ट कुऱ्हाडीनं छाटलं अन् विहिरीत फेकलं, शुद्धीवर आल्यावर तरुण म्हणाला...

VIP असो की सरकारी अधिकारी, महामार्गावर टोल लागणार; सरकार बदलणार नियम

वजन कमी करण्यासाठी भन्नाट उपाय! फक्त रात्री झोपण्यापूर्वी करा 'हे' १ काम, काही दिवसांतच दिसेल फरक

LPG च्या नियमात पुन्हा बदल; आता ग्राहकांना आणखी पैसे मोजावे लागणार

Beed : बीडमध्ये धक्कादायक प्रकार! कराडच्या गुंडांकडून महिलेला अमानुष मारहाण, प्रायव्हेट पार्टवर बेल्टने हल्ला

SCROLL FOR NEXT