rohit sharma gloves mumbai indian (x)
Sports

Rohit Sharma : रोहित शर्माच्या ग्लोव्हजची का होतेय चर्चा? SAR चा नेमका अर्थ काय? पाहा व्हिडीओ

IPL 2025 : मुंबई इंडियन्सने शेअर केलेल्या एका व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. या व्हिडीओमध्ये रोहित शर्माचे ग्लोव्हज पाहायला मिळत आहेत. त्या ग्लोव्हजवर नक्की काय लिहिलंय? जाणून घ्या..

Yash Shirke

IPL 2025 News : इंडियन प्रीमियर लीगच्या नव्या सीझनला आज सुरुवात होणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हा आयपीएल २०२५ मधील पहिला सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्स येथे खेळला जाणार आहे. उद्या रात्री मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे बलाढ्य संघ आमनेसामने असतील.

आयपीएलमधील सर्वच १० संघांनी खेळाची जय्यत तयारी केली आहे. या सीझनमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाची चर्चा होत आहे. मुंबईचा संघ अन्य संघांपेक्षा जास्त सरस असल्याचे म्हटले जात आहे. याच दरम्यान मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या ग्लोव्हजची सोशल मीडियावर चर्चा होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

मुंबई इंडियन्सच्या पेजवर एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये रोहित शर्माने घातलेल्या ग्लोव्हजवर फोकस केल्याचे पाहायला मिळते. हिटमॅनच्या ग्लोव्हजवर इंग्रजीमध्ये SAR असे लिहिलेले आहे. यातील S चा अर्थ समायरा, A चा अर्थ अहान आणि R चा अर्थ रितिका असा असल्याचे म्हटले जात आहे. या ग्लोव्हजमुळे रोहित शर्माला चाहते 'फॅमिली मॅन' म्हणत आहेत.

आज (२२ मार्च) रोजी आयपीएलच्या अठराव्या सीझनला सुरुवात होईल. आज केकेआर आणि आरसीबी असा सामना रंगेल. उद्या (२३ मार्च) रोजी डबल हेडर सामने असतील. उद्या दुपारी पहिला सामना हैदराबाद आणि राजस्थान यांच्यात खेळला जाईल, तर रात्री मुंबई आणि चेन्नईचे संघ एकमेकांना भिडतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lifestyle habits: महिलांनो...तुम्हाला या ५ सवयी असतील तर अकाली दिसू शकता वृद्ध!

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत

Crime News: प्रेमसंबंधाचा रक्तरंजित शेवट; एक्स गर्लफ्रेंडवर २० हून अधिक वार, नंतर तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

310 कोटींचा तोटा… एसटी तिकीट महागणार? महायुती सरकारने दिले संकेत|VIDEO

'त्याने सर्व निकष पूर्ण केलेत...'; १५ वर्षाच्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात स्थान द्या, माजी खेळाडूचं मोठं वक्तव्य

SCROLL FOR NEXT