Rohit Sharma For T 20 World Cup 2024, Team India Selection SAAM TV
Sports

T20 World Cup साठी १० खेळाडू फिक्स; रोहित शर्मानं संभाव्य संघाबाबत केला मोठा खुलासा | Rohit Sharma

Team India, T 20 World Cup 2024 : वेस्ट इंडीज आणि अमेरिकेत खेळवल्या जाणाऱ्या आयसीसी टी २० वर्ल्डकप स्पर्धेबाबत टीम इंडियाच्या चमूबद्दल रोहित शर्माने महत्वाची अपडेट दिली आहे.

Nandkumar Joshi

Team India Squad For T20 World Cup :

अफगाणिस्तान संघाला पराभूत केल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा यानं टी २० वर्ल्डकपकडे लक्ष केंद्रीत केल्याचं दिसतंय. वेस्ट इंडीज आणि अमेरिकेत खेळवल्या जाणाऱ्या आयसीसी टी २० वर्ल्डकप स्पर्धेबाबत टीम इंडियाच्या चमूबद्दल महत्वाची अपडेट दिली आहे.

अफगाणिस्तानविरुद्धचा तिसरा टी २० सामना जिंकल्यानंतर रोहित शर्मानं बोलता बोलता टी २० वर्ल्डकपसाठी भारताच्या संभाव्य संघ कसा असेल याचे संकेत दिले आहेत.

टी २० वर्ल्डकप २०२४ स्पर्धा १ ते २९ जून या कालावधीत होणार आहे. आयसीसीच्या या स्पर्धेत २० संघ मैदानात उतरणार आहेत. भारतीय संघ हा या स्पर्धेच्या जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे.

कोणत्याही मोठ्या स्पर्धेत उतरण्याआधी भारतीय संघाच्या तयारीआधी संघ निवडीचीच अधिक चर्चा होते. रोहित शर्मा याने आपल्या संघाची निवड केली आहे का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. टी २० वर्ल्डकपसाठी भारताचा संभाव्य संघ कसा असेल याचे संकेत रोहित शर्माने बेंगळुरूमध्ये झालेल्या टी २० सामन्यानंतर दिले आहेत.

८ ते १० खेळाडूंची नावं फिक्स?

अफगाणिस्तानविरुद्धची टी २० मालिका जिंकल्यानंतर रोहित शर्मानं वर्ल्डकप स्पर्धा जिंकण्याचा प्रयत्न असेल असे सांगितले आहे. जेतेपदासाठी काय तयारी केलीय यावरही त्यानं अप्रत्यक्ष भाष्य केलं आहे. अद्याप १५ खेळाडूंची नावं अंतिम केली नाहीत. मात्र, आठ ते दहा खेळाडू असे आहेत ते या वर्ल्डकपसाठीच्या संघामध्ये असू शकतात, असं तो म्हणाला.

संघ निवडताना काय असेल रणनीती?

भारताच्या संभाव्य संघ निवडीबाबत रोहित शर्मानं महत्वाचं विधान केलं आहे. परिस्थिती बघून निर्णय घेण्यात येईल, असं रोहित शर्मा म्हणाला. वेस्ट इंडीजमध्ये कंडिशन स्लो असते. ते बघूनच संघ निवडला जाईल, असेही तो म्हणाला.

रोहित शर्माने टीम इंडियाबाबत केलेल्या वक्तव्यानं संभाव्य संघ कसा असेल याचे अंदाज बांधले जात आहेत. रोहित शर्मानं जवळपास १० खेळाडूंची नावं निश्चित केलेली असावीत. उर्वरित पाच खेळाडूंच्या नावांवर खल होण्याची शक्यता आहे. तर निवड समिती ही वेस्ट इंडीजच्या कंडीशनवर लक्ष ठेवून असेल. त्यानंतर संघ निवड केली जाण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT