rohit sharma  twitter
क्रीडा

Rohit Sharma Statement: दारुण पराभवानंतर रोहित शर्मा भडकला! या खेळाडूंवर फोडलं पराभवाचं खापर

Rohit Sharma On Defeat, IND vs SL 3rd ODI: श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यातील पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मा भडकल्याचे पाहायला मिळाले आहे.

Ankush Dhavre

भारतीय संघाला श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात ११० धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे. या विजयासह भारतीय संघाला वनडे मालिका २-० ने गमवावी लागली आहे. मालिकेतील पहिला सामना बरोबरीत सुटल्यानंतर मालिकेतील पुढील दोन्ही सामन्यांध्ये भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. या पराभवानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा नाराज असल्याचं दिसून आलं आहे. (Rohit Sharma On Defeat)

काय म्हणाला रोहित शर्मा?

या मालिकेत भारताचे फलंदाज श्रीलंकेच्या फिरकी गोलंदाजांसमोर फलंदाजी करताना अडचणीत सापडल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान या सामन्यानंतर बोलताना रोहित शर्मा म्हणाला की, ' ही चिंतेची बाब आहे,असं मला मुळीच वाटत नाही. मात्र ही अशी गोष्ट आहे,ज्याचा आम्हाला गांभीर्याने विचार करावा लागेल.'

टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर भारतीय खेळाडू निष्काळजी होऊन खेळत आहेत का? या प्रश्नाचं उत्तर देताना रोहित म्हणाला की, 'नाही, हा चेष्टेचा विषय नाही. जेव्हा तुम्ही भारतीय संघासाठी खेळता तेव्हा हलगर्जीपणा चालत नाही. श्रीलंकेला श्रेय द्यावं लागेल. त्यांनी आमच्याहून चांगला खेळ केला नाही. त्यामुळेच आम्ही इथे उभे आहोत.'

भारतीय संघाचा २७ वर्षांनी पराभव

या सामन्यात भारतीय संघाला विजयासाठी २४९ धावांची गरज होती. मात्र भारतीय संघाचा डाव १३८ धावांवर आटोपला. या सामन्यात एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा ३५ धावा करत माघारी परतला. तर शुभमन गिलला अवघ्या ६ धावा करता आल्या. तर विराट कोहली या सामन्यातही फ्लॉप ठरला. त्याला या सामन्यात २० धावा करता आल्या. तर रिषभ पंत ६, श्रेयस अय्यर ८,अक्षर पटेल २ ,रियान पराग १५ आणि शिवम दुबे अवघ्या ९ धावा करत माघारी परतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT