Rohit Sharma Female Fan Viral Video Insta
Sports

Viral Video : रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती अन् फॅन ढसाढसा रडली, पाहा भावनिक व्हिडीओ

Rohit Sharma : रोहित शर्माने कसोटी क्रिकेट फॉरमॅटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. त्याने इन्स्टा स्टोरी पोस्ट करुन निवृत्तीची घोषणा केली. त्याच्या या निर्णयामुळे अनेक चाहते नाराज झाले आहेत.

Yash Shirke

IPL 2025 सुरु असताना अचानक रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत त्याने तडकाफडकी निवृत्तीची घोषणा केली. रोहितने घेतलेल्या या निर्णयामुळे चाहत्यांमध्ये नाराजी पसरली आहे. सोशल मीडियावर चाहत्यांनी रोहितच्या निवृत्तीच्या घोषणेवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशाच हिटमॅनच्या एका चाहतीच्या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधले आहे. रोहितने निवृत्ती घेतल्याने ही चाहती धसाधसा रडत असल्याचे व्हिडीओत पाहायला मिळते.

रोहित शर्माच्या चाहतीचे नाव जिनिया देबनाथ असल्याची माहिती समोर आली आहे. जिनियाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये जिनिया तिच्या आईला रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याचे सांगते. 'मला आता काहीही चांगलं वाटत नाहीये. मला स्टेडियममध्ये जाऊन रोहितला कसोटी सामन्यात खेळताना पाहायचे होते पण हे आता शक्य होणार नाही, रोहितने कसोटी क्रिकेट सोडले आहे. माझे स्वप्न अपूर्ण राहिले', असे म्हणत जिनिया रडत असल्याचे व्हिडीओत दिसते.

जिनियाने पुढे म्हणाली, तुला समजणार नाही. मला वाटले होते, रोहित शर्मा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपही जिंकेल. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल जिंकणारा टीम इंडियाचा नेतृत्व करणारा रोहित शर्मा पहिला भारतीय कर्णधार असेल. जिनियाच्या व्हिडीओच्या कमेंट बॉक्समध्ये रोहितच्या अन्य चाहत्यांनीही हिटमॅनच्या निवृत्तीवर नाराजी व्यक्त केली आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्त्वात टीम इंडियाने मागील दोन कसोटी मालिका गमावल्या होत्या. न्यूझीलंडने टीम इंडियाला भारतात वाईट वॉश केले होते. याशिवाय बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्येही भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. जून २०२५ मध्ये टीम इंडिया इंग्लंड दौरा करणार आहे. या दौऱ्यामध्ये कसोटी संघात कर्णधारपदासाठी रोहितचा विचार होत नसल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्याच दरम्यान रोहितने कसोटी क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : महाराष्ट्र एक्सप्रेसची भीषण धडक; महिलेसह 15 शेळ्यांचा दुर्दैवी मृत्यू, परिसरात हळहळ

Bank Holiday June 2026: महत्त्वाची बातमी! जून महिन्यात इतक्या दिवस बँका बंद, तारखा आताच नोट करा

Vaibhav Sooryavanshi: जिंकली आरसीबी, हवा मात्र वैभवची; मिळाले 5 अवॉर्ड्स, लाखो रूपये आणि नवी कोरी कार

Maharashtra News Live Update: जळगाव विधान परिषदेसाठी नंदकिशोर महाजन यांना भाजपाची उमेदवारी

Saphale Fort : पाऊस अन् ट्रेकिंग, वीकेंडला करा सफाळेजवळील 'या' किल्ल्याची सफर

SCROLL FOR NEXT