Rohit Sharma Shardul Thakur x
Sports

Rohit Sharma Video : स्वत:ला लॉर्ड बोलतोस का? शार्दुल ठाकूरच्या 'बोलंदाजी'वर मैदानातच रोहितचा षटकार, Video व्हायरल

Rohit Sharma Shardul Thakur : लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स हा सामना उद्या खेळला जाणार आहे. सामन्याआधी सोशल मीडियावर रोहित शर्मा आणि शार्दुल ठाकूरच्या व्हिडीओची चर्चा होत आहे.

Yash Shirke

IPL 2025 : मुंबई इंडियन्सने वानखेडे स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव केला. आता मुंबईचा पुढील सामना लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध असणार आहे. उद्या एकना स्टेडियमवर मुंबई आणि लखनऊ हा सामना खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी मुंबईचा संघ लखनऊला पोहोचला आहे. याच दरम्यान मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडीओच्या सुरुवातीला शार्दुल ठाकूर समोरून येत असल्याचे दिसते. तो रोहित शर्माकडे पाहून 'रोहित शर्मा मैदानामध्ये फक्त एकाच व्यक्तीला भेटायला येतो.. तो म्हणजे द लॉर्ड!' असे म्हणतो. त्यावर शार्दुलला मिठ्ठी मारत रोहित 'स्वत:लाच लॉर्ड म्हणतोस' असे उद्गार काढतो. 'मग काय लॉर्ड बोलणारच.. तूच माझं नाव लॉर्ड ठेवलं आहेस ना..' असे म्हणत शार्दुल सुद्धा हसू लागतो.

शार्दुलला भेटल्यानंतर रोहित शर्मा झहीर खानला भेटतो आणि झहीरला देखील घट्ट मिठ्ठी मारतो. रोहित-शार्दुल-झहीर खानच्या व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. तिघेजण रणजीसह अनेक देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये मुंबईकडून खेळले होते. तिघांनी भारताचे प्रतिनिधित्त्व देखील केले आहे. रोहितच्या नेतृत्त्वात शार्दुल ठाकूर खेळला आहे.

आयपीएलमध्ये रोहित शर्मा हा मुंबई इंडियन्सकडून खेळत आहे. तो मुंबईचा प्रमुख सलामीवीर आहे. आयपीएल मेगा ऑक्शनमध्ये बोली न लागलेल्या शार्दुल ठाकूरने जबरदस्त कमबॅक करत आपले सामर्थ्य दाखवून दिले आहे. तो आयपीएल २०२५ मध्ये लखनऊच्या संघाकडून खेळत आहे. तर झहीर खान सध्या लखनऊच्या संघाचा गोलंदाजी विभागाचा प्रमुख प्रशिक्षक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: वसई रेल्वे क्षेत्रातील दोन महत्त्वाच्या रुळांची उंची ४०० मिमी वाढवण्यात येणार

Local Train Update : नालासोपारा-वसईत ट्रॅकवर पाणी साचण्याची कटकट संपणार, रेल्वेने घेतला 'हा' मोठा निर्णय

Filmmaker Death: प्रसिद्ध चित्रपट निर्मात्यांचे ५७ व्या वर्षी निधन, सिनेसृष्टीवर शोककळा

Relationship Tips: पार्टनर फक्त 'टाईम पास' करतो? 'या' 7 संकेतांवरून ओळखा मनातील खोट

Indian Railways : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! WhatsApp वरचं तिकीट दाखवून प्रवास करता येणार नाही, हे कागदपत्रेसोबत असणे अनिवार्य

SCROLL FOR NEXT