Sarfaraz Khan saam tv
Sports

Sarfaraz Khan: पंत रनआऊट होणारच होता, अचानक सरफराज जोरजोरात उड्या मारू लागला, मैदानात काय घडलं? Viral Video

Sarfaraz Khan: भारत विरूद्ध न्यूझीलंड यांच्यात झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियाने दुसर्‍या डावात खेळ सावरला. यावेळी सरफराज खानच्या एका कृत्याने एकच हशा पिकला.

Surabhi Jayashree Jagdish

बंगळूरूमध्ये सध्या भारत विरूद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये सामना रंगणार आहे. या सामन्यात टीम इंडियाने दुसर्‍या डावात खेळ सावरला. यावेळी सरफराज खान आणि ऋषभ पंत यांनी चांगली पार्टनरशिप करत स्कोर वाढवला. मात्र हे दोन्ही खेळाडू खेळत असताना एक वेळ अशी आली होती की, या दोघांची पार्टनरशिप तुटणार होती. दरम्यान यावेळी सरफराज खानच्या एका कृत्याने एकच हशा पिकला.

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या टेस्टमध्ये पहिल्या डावात न्यूझीलंडचे वर्चस्व होतं. तर दुसऱ्या डावामध्ये टीम इंडिया वरचढ ठरल्याचं दिसून आलं. दरम्यान, चौथ्या दिवशी टीम इंडियाचा दुसरा डाव सुरू असताना सरफराज आणि पंत यांच्यामध्ये मोठा गोंधळ झाल्याचं दिसलं.

चौथ्या दिवशी भारताकडून दुसऱ्या डावात सर्फराज खान आणि ऋषभ पंत फलंदाजी करत होते. त्यांची पार्टनरशिप देखील चांगली झाली होती. सर्फराजचं शतक होण्यापूर्वी त्याची पंतबरोबरची भागीदारी तुटता तुटता वाचली.

मैदानावर नेमकं काय घडलं?

५६ व्या ओव्हरमध्ये मॅट हेन्री गोलंदाजी करत असताना पहिल्या बॉलवर सर्फराजने डीप बॅकवर्ड पाँइंटला शॉट खेळला. त्यावेळी या दोघांनी एक रन घेतला. यानंतर दुसरा रन घेण्याचा विचार केला होता. मात्र ते शक्य नसल्याचं लक्षात येताच सर्फराजने पंतला नाही असं सांगितलं. पंतने सरफराजकडे पाहिलंच नाही आणि तो दुसऱ्या रनसाठी पळू लागला. याचवेळी सर्फराज उड्या मारून त्याला नाही सांगण्याचा प्रयत्न करत होता. परंतु, पंतचं बॉलकडे लक्ष असल्याने त्याने त्याच्याकडे पाहिलं नाही.

या घटनेवेळी न्यूझीलंडचा विकेटकीपर टॉम ब्लंडेल बॉल घेण्यासाठी स्टंपकडे पाठ करून उभा होता. त्याने फिल्डरकडे फेकलेला बॉल उचलला आणि फेकला. पण त्याचा निशाणा चुकीचा ठरला. यामुळे पंत रनआऊट झाला नाही. यानंतर सर्फराज पंतवर थोडा चिडतानाही दिसला. या घटनेचा व्हिडिओही सध्या व्हायरल होतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नवी मुंबई महानगरपालिकेचे ठेकेदारांनी अर्धवट काम करून बिल काढली

गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच्या मांडीवर बसली, धावत्या बसमध्ये शारीरिक संबंध; VIDEO व्हायरल करत प्रवाशांनी झापलं

Dhodhadi Waterfall: मुंबईपासून फक्त साडेतीन तासांच्या अंतरावर आहे हा सुंदर धबधबा, पुढचा प्लान इथे नक्की करा

Child Brain Health : लहान मुलांना हे पदार्थ देताय? सावधान! अन्यथा मेंदूवर होईल परिणाम

Reshma Shinde: माझ्या नयनी नक्षत्र तारा आणि चांद तुझ्या डोळ्यात...

SCROLL FOR NEXT