Rishabh Pant Latest News/File SAAM TV
Sports

Rishabh Pant : माझा रेकॉर्ड खराब नाही...Live इंटरव्ह्यूमध्ये भिडला रिषभ पंत, VIDEO पाहा

रिषभ पंत कों गुस्सा क्यों आता हैं.....लाइव्ह इंटरव्ह्यूवेळी समालोचकाला दिलं रोखठोक उत्तर...

Nandkumar Joshi

Rishabh Pant Interview : न्यूझीलंड दौऱ्यावर टीम इंडियाचा उपकर्णधार रिषभ पंत खराब फॉर्मशी झुंजत आहे. त्यामुळं त्याचं टीम इंडियातील स्थान धोक्यात आलं आहे. काही क्रिकेटमधील जाणकार त्याच्या टीममधील असण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.

त्याचवेळी एका लाइव्ह इंटरव्ह्यूमध्ये रिषभ पंतनं स्वतःच आपल्या फॉर्मविषयी रोखठोक मत मांडलं आहे. माझे आकडे इतके पण वाईट नाहीत, असं तो म्हणाला. समालोचक हर्षा भोगले यांनी त्याचा इंटरव्ह्यू घेतला. त्याला खराब फॉर्मविषयी विचारलेल्या प्रश्नावर तो थेट भिडला.

तिसऱ्या सामन्याच्या काही तास आधीच हर्षा भोगले यांनी रिषभ पंतची मुलाखत घेतली. मी टी २० क्रिकेटमध्ये सलामीला येऊ इच्छितो, असं रिषभनं थेट सांगितलं. तर वनडेमध्ये चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येणे योग्य आहे. तर कसोटीत मी पाचव्या स्थानी फलंदाजी करतो. पण प्रशिक्षक आणि कर्णधार टीमसाठी काय योग्य आहे याचा विचार करतात. त्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. मला जेव्हा कधी संधी मिळते, त्यावेळी मी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करतो, असं पंत म्हणाला. (Latest Marathi News)

व्हिडिओ बघा!

'आताच माझी तुलना करू नका'

तुझी कसोटीतील आकडेवारी चांगल आहे. मात्र, वनडे आणि टी २० मधील आकडेवारी इतकीही चांगली नाही, असा प्रश्न हर्षा भोगलेंनी रिषभला विचारला. त्यावर व्हाइट बॉल क्रिकेटमध्ये माझी आकडेवारी इतकीही वाईट नाही. मी आता २४-२५ वर्षांचा आहे. अशात माझी तुलना करणे योग्य नाही. ज्यावेळी मी ३०-३२ चा होईल त्यावेळी अशा प्रकारची तुलना केली जाऊ शकते. यावेळी रिषभ पंत चिडल्याचं दिसलं. (Sports News)

व्हिडिओ व्हायरल, नेटकरी चिडले

रिषभ पंतचा हा इंटरव्ह्यू सोशल मीडियावर व्हायरल झाला. ज्या प्रकारे तो हर्षा भोगलेंशी बोलला ते नेटकऱ्यांना आवडलं नाही. रिषभ पंतच्या बोलण्यात गर्व दिसून येतोय. त्यावर नियंत्रण ठेवायला हवा, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या.

दरम्यान, टी २० वर्ल्डकपमध्ये रिषभ पंतला दोन सामन्यांत संधी मिळाली. पण त्यातही तो अपयशी ठरला. त्यानंतर न्यूझीलंडचा दौराही त्याच्यासाठी निराशाजनक ठरला. त्यामुळे वनडे आणि टी २० मध्ये त्याच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. पुढच्या वर्षी वर्ल्डकप स्पर्धा आहे. अशावेळी आतापासूनच टीम इंडियाकडून खेळाडूंच्या कामगिरीवर विचार सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबईतील विजयी मेळाव्यासाठी नाशिकमध्ये मनसेकडून जोरदार तयारी

Success Story: उच्चशिक्षण घेऊनही गावची माती सुटेना, मावळचा तरूण करतोय कोंबडी पालनाचा व्यवसाय; महिन्याला लाखो रुपयांची कमाई

Sandeep Deshpande: आमचा बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, संदीप देशपांडेंनी व्यापाऱ्यांना सुनावलं

Pakistan Hockey Team : पाकिस्तानी हॉकी संघ भारतात येणार; आशिया कप खेळण्याची मंजुरी | VIDEO

Dora Cake Recipe: लहान मुलांच्या आवडीचा डोरा केक आता बनवा घरी, सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT