न्यूझीलंडविरोधातील पहिल्या कसोटी सामन्यात विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत याने शानंदार शतक ठोकले. पंतच्या शतकी खेळीच्या बळावर भारताने न्यूझीलंडसमोर विराट धावसंख्या उभारली. या शतकी खेळीत पंतने षटकारांचा पाऊ पाडत अनेक विक्रम नावावर केले. पंतने बेन स्टोक्सची बरोबरी करत नवा विश्वविक्रम केला आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये (WTC) सर्वाधिक षटकार मारण्याच्या विक्रमाशी ऋषभ पंतने बरोबरी केली आहे. याची चर्चा सध्या क्रिकेट वर्तुळात रंगली आहे. या यादीत इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स आणि भारताचा कर्णधार रोहित शर्मा यांचेही नाव आघाडीवर आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये आक्रमक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या ऋषभ पंतने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये (WTC) षटकारांची पाऊस पाडला. सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजाच्या यादीत आता पंत पहिल्या स्थानावर पोहचला आहे. त्याने बेन स्टोक्सच्या विश्वविक्रमाची बरोबरी केल्याचे नमूद करण्यात आले आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या इतिहासात सर्वाधिक षटकार लगावणाऱ्या फलंदाजांमध्ये पंतने स्टोक्सच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. पंत आणि स्टोक्स यांनी डब्ल्यूटीसीमध्ये प्रत्येकी ८८ षटकार ठोकले आहेत. आता पंत फक्त एक षटकार मारून इतिहास रचेल. स्टोक्सने आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, त्यामुळे या यादीत पंत पहिल्या क्रमांकावर पोहोचेल. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असलेला रोहित शर्मादेखील लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये सक्रिय नाही.
डब्ल्यूटीसीत सर्वाधिक षटकार मारणारे अव्वल ५ फलंदाज
बेन स्टोक्सने ६४ सामन्यांच्या ११७ डावांमध्ये ८८ षटकार मारले आहेत. ऋषभ पंतने ४३ सामन्यांच्या ७५ डावांमध्ये त्याच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली आहे. ऋषभ पंत आता इतिहास रचण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे. भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा अव्वल ५ फलंदाजांच्या या यादीत अजूनही तिसऱ्या स्थानावर आहे. रोहितने विश्व कसोटी स्पर्धेत ५६ षटकार मारले आहेत. भारताचा विद्यमान कसोटी कर्णधार शुभमन गिल आणि सलामीवीर यशस्वी जैस्वाल यांचाही या यादीत समावेश आहे. गिलने आतापर्यंत ४८ षटकार, तर जैयस्वालने ४५ षटकार मारले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.