rishabh pant  saam tv
Sports

Rishabh Pant Comeback: रिषभचं कमबॅक होणार मात्र विकेटकिपिंग करणं कठीण! समोर आलं मोठं कारण

Rishabh Pant Injury Update: तो भारतीय संघात कमबॅक करेल त्यावेळी तो यष्टिरक्षण करू शकेल का? याबाबत आता मोठी माहिती समोर आली आहे.

Ankush Dhavre

Rishabh Pant: भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत सध्या दुखापतीतून सावरताना दिसून येत आहे. नॅशनल क्रिकेट अॅकेडमीमध्ये तो पुनर्वसन प्रक्रिया पूर्ण करतोय. तो आता पूर्णपणे ठीक होण्याच्या वाटेवर आहे.

मात्र प्रश्न असा उपस्थित होतो की, दुखापतीतून सावरल्यानंतर ज्यावेळी तो भारतीय संघात कमबॅक करेल त्यावेळी तो यष्टिरक्षण करू शकेल का? याबाबत आता मोठी माहिती समोर आली आहे.

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने इन्साईड स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत रिषभ पंतबाबत मोठा खुलासा केला आहे. याबाबत बोलताना अधिकाऱ्याने म्हटले की, 'रिषभ पंतच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा होत आहे. मात्र कमबॅक केल्यानंतर तो यष्टिरक्षण करेल याबाबत जरा शंका आहे.'

रिषभ पंत फिट होऊन सराव करून करण्यासाठी परतला तरी ४-६ महिने तो यष्टिरक्षण करू शकणार नाही. याबाबत बोलताना अधिकाऱ्याने म्हटले की, 'सराव करण्यासाठी परतल्यानंतर यष्टिरक्षण करण्यासाठी त्याला कमीत कमी ३ किंवा ६ महिन्यांपेक्षाही अधिक वेळ लागू शकतो. आम्ही खात्रीशीर काहीच सांगू शकत नाही. सर्वांना धीर घेण्याची गरज आहे. रिषभ पंत युवा खेळाडू आहे. त्याच्याकडे भरपूर वेळ शिल्लक आहे. मात्र त्याची दुखापत पाहता घाई करणं चुकीचं ठरेल.' (Latest sports updates)

गेल्या वर्षी झाला होता अपघात.. (Rishabh Pant Car Accident)

रिषभ पंत हा दिल्लीकडून रुडकीच्या दिशेने जात असताना त्याच्या कारचा अपघात झाला होता. त्याच्यावर देहराडुनच्या रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला मुंबईत शिफ्ट केलं गेलं होतं.

त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्याला स्वत:च्या पायावर चालता देखील येत नव्हतं. मात्र आता तो रिकव्हर होत असुन काही महिन्यात मैदानात खेळताना दिसुन येऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गोवा जिंकण्यासाठी महाराष्ट्रातील 5 नेत्यांवर सोपवली महत्त्वाची जबाबदारी; विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा मोठा निर्णय

Weather Update: विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता; ६ राज्यांसाठी हवामान विभागाचा अलर्ट

Sunday Horoscope: आज कोणाला मिळणार पैशांचा फायदा, कोणाच्या आयुष्यात फुलणार प्रेम? वाचा राशिभविष्य

महाराष्ट्रात पुन्हा खंजीर, पुन्हा गद्दारी? 'पवारांचा इतिहास खंजीर खुपसण्याचा; वडेट्टीवारांचा घणाघात

पवारांच्या राष्ट्रवादीला ठाकरेसेनेचं आव्हान, डिलिमिटेशनवरून ठाकरे विरुद्ध पवार

SCROLL FOR NEXT