rinku singh  saam tv
Sports

Rinku Singh Team Selection: IPL गाजवलेल्या रिंकू सिंगचे नशीब फळफळले; BCCI ने घेतला मोठा निर्णय

Team India Selectors: आता त्याला आयपीएल स्पर्धेत केलेल्या दमदार कामगिरीचं फळ मिळालं आहे.

Ankush Dhavre

Deodhar Trophy 2023: आयपीएल २०२३ स्पर्धेत युवा खेळाडूंचा बोलबाला पाहायला मिळाला होता. या खेळाडूंमध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलेलं नाव म्हणजे रिंकू सिंग. कोलकाता नाईट रायडर्स संघाला अटीतटीच्या लढतीत विजय मिळवून देणाऱ्या या फलंदाजाने फिनिशर म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. दरम्यान आता त्याला आयपीएल स्पर्धेत केलेल्या दमदार कामगिरीचं फळ मिळालं आहे.

सध्या भारतीय संघ वेस्टइंडीज दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी रिंकू सिंगला संधी मिळण्याची चर्चा सुरू होती. मात्र या मालिकेसाठी त्याला संधी दिली गेली नाही. ऋतुराज गायकवाड आणि यशस्वी जयस्वाल सारख्या युवा फलंदाजांना संधी दिली गेली आहे.

आता बीसीसीआयने रिंकू सिंगला देखील मोठं बक्षीस दिलं आहे. त्याला आगामी देवदार ट्रॉफी स्पर्धेसाठी सेंट्रल झोनच्या संघात स्थान दिलं गेलं आहे. या संघाचे कर्णधारपद व्यंकटेश अय्यरकडे सोपवण्यात आले आहे. (Rinku Singh In Deodhar Trophy)

लवकरच भारतीय संघासाठी खेळताना दिसणार..

रिंकू सिंगची वेस्टइंडीजविरुद्ध सुरु असलेल्या मालिकेसाठी निवड करण्यात आली नाही. मात्र त्याचं भारतीय संघासाठी खेळण्याचं स्वप्न लवकरच पूर्ण होऊ शकतं.

भारताचा वेस्टइंडीज दौरा झाल्यानंतर १८ ऑगस्टपासून भारत - आयर्लंड टी-२० मालिकेला प्रारंभ होणार आहे. या मालिकेसाठी त्याला भारतीय संघात संधी दिली जाऊ शकते.

मात्र त्याची भारतीय संघात निवड होणार की नाही, हे त्याच्या देवधर ट्रॉफीतील कामगिरीवर अवलंबून असणार आहे.

जर तो या स्पर्धेत चमकला तर तो थेट भारतीय संघासाठी खेळताना दिसेल. रिंकू सिंगसह शिवम मावी, मोहसिन खान आणि आकाश मधवाल हे खेळाडू देखील भारतीय सेंट्रल झोनकडून खेळताना दिसून येणार आहेत. (Latest sports updates)

देवधर ट्रॉफीसाठी असा आहे सेंट्रल झोनचा संघ : माधव कौशिक, शिवम चौधरी, यश दुबे, यश कोठारी, व्यंकटेश अय्यर (कर्णधार), रिंकू सिंग, आर्यन जुयाल, उपेंद्र यादव,आकाश मधवाल, मोहनराजे. खान , शिवम मावी, कर्ण शर्मा, यश ठाकूर, आदित्य सरवटे, अनिकेत चौधरी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : शेवटच्या श्रावण सोमवारी महादेवाची कृपा होणार; ३ राशींचं नशीब फळफळणार

Shirpur Snake Birthday Celebration : बर्थडे आहे कोब्रा नागाचा! सर्पमित्राचा सोशल मीडियावर रिल्ससाठी थिल्लरपणा, व्हिडिओ व्हायरल होताच...VIDEO

Gajkesari Rajyog: आज गुरु चंद्राच्या युतीने तयार होणार गजकेसरी राजयोग; 'या' राशींवर राहणार लक्ष्मीची कृपा

Todays Horoscope: 'या' राशींना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळतील; वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

SCROLL FOR NEXT