Rinku Singh Five Six cricbuzz
Sports

Rinku Singh 6,6,6,6,6 : IPL च्या इतिहासातला सर्वात चमत्कारिक विजय, शेवटच्या पाच चेंडूत 5 षटकार ठोकून KKR जिंकला!

KKR vs GT Most Miraculous win in IPL History : शेवट्या षटकात 29 धावांची गरज असताना कोलकाताचा फलंदाज रिंकु सिंगने शेवटच्या पाच चेंडूवर 5 षटकार ठोकून केकेआरला विजय मिळवून दिला.

Chandrakant Jagtap

Rinku Singh 6,6,6,6,6 : गुजरात टायटन्सविरोधात कोलकाताने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात चमत्कारिक विजय मिळवला. शेवटच्या षटकात 29 धावांची गरज असताना कोलकाताचा फलंदाज रिंकु सिंगने शेवटच्या पाच चेंडूवर 5 षटकार ठोकून केकेआरला विजय मिळवून दिला.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाइट रायडर्स (GT Vs KKR) यांच्यातील रोमांचक सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला. शेवटच्या षटकात कोलकाताला विजयासाठी 29 धावांची गरज होती. उमेश यादवने पहिल्याच चेंडूवर सिंगल घेत रिंकू सिंगला स्ट्राईक दिली. यानंतर जे घडले ते कुणालाही अपेक्षित नव्हते.

प्रथम फलंदाजी करताना गतविजेत्या गुजरात टायटन्सने कोलकाता नाईट राइडर्सला विजयासाठी २०५ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकात्ता नाईट राईटर्सचे फलंदाज एकापाठोपाठ एक बाद झाले. शेवटच्या षटकात विजयासाठी 29 धावांची गरज होती आणि रिंकू सिंग आणि उमेश यादव क्रीजवर उपस्थित होते.

उमेशने यश दयालच्या पहिल्या चेंडूवर सिंगल धाव घेतली आणि रिंकूला स्ट्राइक दिली. यानंतर रिंकूने कारकिर्दीतील आतापर्यंतची सर्वोत्तम खेळी खेळली. त्याने यश दयालविरुद्ध सलग पाच षटकार मारून कोलकाताला अविश्वसनीय विजय मिळवून दिला. अखेरच्या षटकात रिंकू सिंगने केलेल्या तडाखेबाज फलंदाजीच्या जोरावर कोलकात्ता नाईट राईडर्सने गुजरात टायटन्सवर ३ विकेट्सनी चमत्कारिक विजय मिळवला.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. साई सुदर्शन आणि विजय शंकर यांच्या अर्धशतकांच्या जोरावर गुजरातने 20 षटकांत 4 बाद 204 धावांचे लक्ष्य ठेवले. व्यंकटेश अय्यरने अप्रतिम खेळी खेळली. त्याने 40 चेंडूत 83 धावा केल्या. त्यानंतर गोलंदाजीत रशीद खानने हॅटट्रिक घेत गुजरातची सामन्यातवर पकड जमवली. परंतु रिंकू सिंगच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर कोलकाताने या लक्षाचा यशस्वी पाठलाग केला.

गुजरात टायटन्सची प्लेइंग इलेव्हन

ऋद्धिमान साहा (यष्टीरक्षक), शुभमन गिल, साई सुदर्शन, विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, अभिनव मनोहर, रशीद खान (कर्णधार), मोहम्मद शमी, अल्झारी जोसेफ आणि यश दयाल.

कोलकाता नाईट रायडर्सची प्लेइंग इलेव्हन

रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), एन जगदीसन, नितीश राणा (कर्णधार), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, शार्दुल ठाकूर, सुयश शर्मा, लॉकी फर्ग्युसन, उमेश यादव आणि वरुण चक्रवर्ती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT