Reliance Foundation Young Champs win Mumbai regional Final by beating mumbai City Football Club by 5-0 amd2000  file
Sports

Dream Sports Championship: रिलायन्स फाऊंडेशन यंग चॅम्प्स मुंबई विभागीय स्पर्धेत विजेता

Football News: ड्रीम स्पोर्ट्स फाउंडेशन अजिंक्यपद (१७ वर्षांखालील) राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत पहिल्या टप्प्यात मुंबई विभागातून रिलायन्स फाऊंडेशन यंग चॅम्प्स संघाने विजेतेपद पटकावले.

Ankush Dhavre

Dream Sports Championship:

ड्रीम स्पोर्ट्स फाउंडेशन अजिंक्यपद (१७ वर्षांखालील) राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत पहिल्या टप्प्यात मुंबई विभागातून रिलायन्स फाऊंडेशन यंग चॅम्प्स संघाने विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात त्यांनी मुंबई सिटी एफसी संघाचा ५-० असा पराभव केला. मुंबईतील कुपरेज मैदानावर हे सामने खेळले गेले.

रिलायन्स यंग फाउंडेशन यंग चॅम्प्सकडून कोन्थौजम किंग्सन (४९वे मिनिट), अनिश टेंबुलकर (१४, ८३वे मिनिट), मुशुब बिन याकूब (२१वे मिनिट) आणि मोहम्मद साकिब शेख (७१वे मिनट) यांनी गोल केले. सामन्यातील सर्वोत्तम कमगिरीसाटी मोहम्मद साकिब शेख सामन्याचा मानकरी ठरला.

रिलायन्स फाऊंडेशन यंग चॅम्प्स संघाने सामन्याच्या सुरुवातीपासून चेंडूंवर नियंत्रण राखताना वर्चस्व राखले होते. प्रतिस्पर्धी संघावर आक्रमण करण्याची एकही संधी त्यांनी सोडली नाही. अचूक पास आणि चेंडू ड्रिब्लिंगचे (पायात खेळवणे) सुरेख कौशल्य दाखवले. त्यांनी मुंबई सिटी एफसीच्या खेळाडूंवर दडपण ठेवले. मध्यंतराला रिलायन फाऊंडेशन यंग चॅम्प्स संघ २-० अशा आघाडीवर होता. उत्तरार्धात त्यांनी खेळाचा वेग वाढवून अधिक आक्रमक खेळत आणखी तीन गोल केले.

रिलायन्स फाउंडेशन यंग चॅम्प्स संघाचा राइट विंगर म्हणून खेळणारा मोहम्मद शेख सामन्याचा मानकरी ठरला. मोहम्मद म्हणाला, 'आमचा खेळ खरोखरच चांगला झाला. आम्ही आमचे नियोजन तंतोतंत पाळले. ताबा ठेवा आणि सतत आक्रमण करुन बचावपटूंवर दबाब टाका असे आमचे सोपे नियोजन होते. या नियोजनामुळे आमच्याकडे गोल करण्याच्या संधी निर्माण करण्यासाठी पुरेसा वेळ होता. याचा फायदा घेत आमच्या खेळाडूंनी गोल करण्याच्या चांगल्या संधी निर्माण केल्या.'

रिलायन्स फाऊंडेशन यंग चॅम्प्स ९ गुणांसह अ गटात अव्वल स्थानावर आहेत. त्यांनी त्यांचे गटातील सर्व सामने जिंकले. मुंबई सिटी एफसी संघ देखिल सर्व सामने जिंकून ब गटात अव्वल स्थानावर राहिले. विशेष म्हणजे रिलायन्सने संपूर्ण सामन्यात एकही गोल स्विकारला नाही.

पहिल्या सामन्यात युश सॉकर अकादमी संघावर ८-० असा विजय मिळवून रिलायन्स संघाने आपल्या प्रवासास आश्वासक सुरुवात केली. त्यांचा हा प्रवास मुंबई सिटी एफसीविरुद्धच्या दणदणीत विजयाने पूर्ण झाला.

रिलायन्स फाउंडेशन यंग चॅम्प्स संघाचे प्रशिक्षक समीर समसिद्दिन शेख म्हणाले, ड्रीम स्पोर्ट्स अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन खूप महत्वाचे आहे. यासाठी आम्ही सर्व त्यांचे अभिनंदन करतो. देशातील फुटबॉल विकास करण्यासाठी हे स्पर्धा खूप महत्वाची ठरणार आहे. अशा प्रकारच्या आणखी स्पर्धा व्हायला हव्यात, जेणेकरुन भारतातून जागतिक दर्जाचा फुटबॉलपटू घडविण्याचा मार्ग मोकळा होईल.

दोन टप्प्यापर्यंत ईस्ट बंगाल एफसी, मुंबई सिटी एफसी आणि रिलायन्स फाउंडेशन यंग चॅम्प्स संघांनी अंतिम फेरीत स्थान मिळविले आहे. ड्रीम स्पोर्ट्स अजिंक्यपद स्पर्धेच्या शिलॉंग येथील टप्प्याला आजपासून सुरुवात झाली. ही स्पर्धा १३ एप्रिलपर्यंत चालेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काँग्रेसची 'वंचित'ला निवडणुकीसाठी साद; प्रकाश आंबेडकर काय निर्णय घेणार? VIDEO

भारतातही 16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी? कारण काय? VIDEO

Saturday Horoscope : येत्या काही दिवसांत मोठं काही तरी घडणार; 5 राशींच्या लोकांचे आयुष्य आनंदाने फुलून जाणार

Pune Politics : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची युती फिस्कटली? पुण्यात नेमकं काय घडलं?

Syria Masjid Blast : मशिदीत नमाजावेळी बॉम्बस्फोट; 12 जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT