kkr vs rcb saam tv
Sports

RCB vs KKR: पावसाने सामन्यावर फिरवलं पाणी; गतविजेता केकेआर संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर, जाणून घ्या पॉइंट टेबलची स्थिती

RCB vs KKR Match update : रॉयल चँलेजर्स बेंगळुरु आणि कोलकाता नाइटरायडर्स सामना रद्द झालाय. यामुळे केकेआर संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर गेला आहे.

Vishal Gangurde

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये आज रॉयल चँलेजर्स बेंगळुरु आणि कोलकाता नाइटरायडर्स सामना रद्द झाला आहे. पावसाने सामन्यावर पाणी फिरवलं आहे. यामुळे गतविजेता कोलकाता संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर गेला आहे. केकेआरचा संघ १२ अंकांनी गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. त्यामुळे केकेआर संघाची प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता मावळली आहे. आरसीबीचा संघ गुणतालिकेत १७ अंकांनी पहिल्या स्थानावर आहे. त्यांचं प्लेऑफमधील स्थान निश्चित झालं आहे. आरसीबीचे दोन सामने शिल्लक आहेत.

आयपीएल पार्ट-२ चा पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. स्टेडिअममध्ये मोठ्या संख्येने चाहते आले होते. कोहलीने टेस्टमध्ये निवृत्ती जाहीर केल्यानंतर मैदानात पहिल्यांदा खेळायला उतरणार होता. विराट कोहलीसाठी मोठ्या संख्येने त्याचे चाहते स्टेडिअममध्ये पोहोचले होते. जोरदार पावसामुळे सामन्याचा टॉस देखील झाला नाही.

आयपीएल २०२५ च्या गुणतालिकेत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु पहिल्या क्रमांकवर आहे. आरसीबीने १२ सामन्यांपैकी ८ सामने जिंकले आहेत. आरसीबी १७ गुण मिळवून पहिल्या क्रमांकवर आहे. आरसीबीची प्लेऑफमधील जागा निश्चित झाली आहे. दुसरीकडे केकेआर १३ सामने खेळून ११ गुणांसोबत गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. केकेआर प्लेऑफच्या शर्यतीतून पूर्णपणे बाहेर गेली आहे.

इंडियन प्रीमिअर लीगच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु आणि कोलकाता नाइट रायडर्सदरम्यान ३६ सामने झाले आहेत. यातील २० सामने केकेआरने जिंकले आहेत. तर १५ सामने ही आरसीबीने जिंकले आहेत. तर एक सामना अनिर्णीत राहिला. याआधी २२ मार्च २०२५ रोजी दोन्ही संघात ईडन गार्डन्स मैदानात सामना झाला होता. या सामन्यात आरसीबीने ७ गडी राखून सामना जिंकला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पश्चिम विदर्भातील 56 तालुक्यात दुष्काळ जाहीर

आमदार-खासदारांशी उद्धटपणे वागाल तर खबरदार...; अधिकाऱ्यांसाठी सरकारकडून नवे नियम जाहीर

Om Namah Shivaya Mantra Benefits: रोज १०८ वेळा ॐ नमः शिवाय मंत्राचा जप केल्याने शरीरावर आणि मनावर काय परिणाम होतो?

Chandrashekhar Bawankule : ओबीसींना आता १ रुपयात जमीन मिळणार! चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय, सर्व विभागांना आदेश; पाहा सविस्तर

Pune Fort : पुण्याजवळ दडलाय इतिहासाचा खजिना! दोन डोंगरांवर वसलाय भव्य किल्ला

SCROLL FOR NEXT