RCB created new record in t20 cricket scored the highest total while chasing amd2000 Twitter
Sports

RCB vs SRH : टी -२० क्रिकेटमध्ये जे कोणालाच नाही जमलं ते RCB ने करून दाखवलं! पराभूत होऊनही रचला इतिहास

RCB Record In T20 Cricket: या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. मात्र पराभूत होऊनही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे.

Ankush Dhavre

सनरायझर्स हैदराबाद संघातील फलंदाजांनी बंगळुरूच्या मैदानावर तुफान फटकेबाजी केली. या सामन्यात हैदराबादने २० षटक अखेर ३ गडी बाद २८७ धावा केल्या. ही आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे. सनरायझर्स हैदराबाद संघाने या हंगामात दुसऱ्यांदा २७० धावांचा पल्ला गाठला आहे. यापूर्वी मुंबई इंडियन्सविरुद्ध झालेल्या सामन्यात हैदराबादने २७७ धावा कुटल्या होत्या. दरम्यान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात आणखी एक मोठा रेकॉर्ड मोडला गेला आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हा संघ रेकॉर्ड करण्यासाठी ओळखला जातो. आतापर्यंत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने अनेक मोठ मोठे रेकॉर्ड केले आहेत. दरम्यान पराभूत होऊनही या संघाच्या नावे एका मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करत असलेल्या सनरायझर्स हैदराबाद संघाच्या फलंदाजांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघातील गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. २० षटक अखेर या संघाने २८७ धावा केल्या. ही या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या आहे. यापूर्वी कुठल्याच संघाने हा आकडा गाठला नव्हता. या धावांचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने २६२ धावा केल्या. आतापर्यंत तब्बल १३ हजारांहून अधिक टी -२० सामने खेळले गेले आहेत. मात्र कुठल्याच संघाला धावांचा पाठलाग करताना २६२ धावा करता आल्या नव्हत्या. असा रेकॉर्ड करणारा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हा पहिलाच संघ ठरला आहे.

आयपीएल स्पर्धेत सर्वात कमी धावसंख्या करण्याचा रेकॉर्ड हा देखील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या नावावर आहे. २०१७ मध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा डाव अवघ्या ४९ धावांवर आटोपला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : विदर्भातील सात जिल्ह्यात आज जोरदार पावसाचा इशारा

Liver disease: एड्सपेक्षाही धोकादायक आहे 'हा'लिव्हरचा आजार; 'साइलेंट किलर' समस्येची लक्षणंही वेळीच जाणून घ्या

Fraud Case : पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवत ३०० कोटींची फसवणूक; शेकडो गुंतवणूकदार अडचणीत

Ankita Lokhande : नाकात नथ अन् कानात बुगडी; अंकिता लोखंडेचा मराठमोळा साज, पाहा PHOTO

Railway Recruitment: रेल्वेत सरकारी नोकरीची संधी; या पदांसाठी भरती सुरु; अर्ज कसा करावा?

SCROLL FOR NEXT