Ravindra jadeja Saam tv news
Sports

Ravindra Jadeja Record: केवळ 1 विकेट अन् रविंद्र जडेजा इतिहास रचणार! हा रेकॉर्ड करणारा ठरणार तिसराच भारतीय

IND vs BAN 2nd Test, Ravindra Jadeja Record: भारताचा स्टार गोलंदाज रविंद्र जडेजाला दुसऱ्या कसोटीत एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर करण्याची संधी असणार आहे.

Ankush Dhavre

भारत आणि बांगलादेश यांच्यातील २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना चेन्नईत पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने २८० धावांनी विजय मिळवला. आता मालिकेतील दुसरा कसोटी सामना कानपूरमध्ये रंगणार आहे. मालिकेतील पहिल्या कसोटीत जसप्रीत बुमराह, आर अश्विन, रिषभ पंत आणि शुभमन गिल यांनी दमदार खेळ केला. दरम्यान दुसऱ्या सामन्यात रविंद्र जडेजाला मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर करण्याची संधी असणार आहे.

जडेजाला मोठा रेकॉर्ड करण्याची संधी

रविंद्र जडेजा हा भारतीय संघातील प्रमुख अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आहे. गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातही त्याचा जलवा पाहायला मिळत असतो. आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये गोलंदाजी करताना त्याने २९९ गडी बाद केले आहेत. तर फलंदाजी करताना त्याने ३१२२ धावा केल्या आहेत.

बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत १ गडी बाद करताच तो दिग्गज खेळाडूंच्या यादीत प्रवेश करणार आहे. आतापर्यंत केवळ १० असे क्रिकेटपटू आहेत,ज्यांना कसोटी क्रिकेटमध्ये ३०० गडी बाद करण्यासह ३००० धावा करण्यात यश आलं आहे. असा रेकॉर्ड करणारा जडेजा ११ वा खेळाडू ठरणार आहे.

असा रेकॉर्ड करणारा तिसरा भारतीय

कसोटी क्रिकेटमध्ये ३००० धावा आणि ३०० गडी बाद करणारा जडेजा ११ वा खेळाडू ठरेल. तर असा रेकॉर्ड करणारा तो तिसरा भारतीय खेळाडू ठरणार आहे. याआधी आर अश्विन आणि कपिल देव यांनी हा कारनामा करुन दाखवला आहे. आर अश्विनच्या नावे आतापर्यंत ५२२ गडी बाद करण्याची आणि फलंदाजी करताना ३४२२ धावा करण्याची नोंद आहे. तर कपिल देव यांनी गोलंदाजीत ४३४ आणि फलंदाजी करताना ५२४८ धावा केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Boondi Ladoo Recipe: संध्याकाळी लागलेल्या भूकेसाठी झटपट बनवा टेस्टी बुंदी लाडू

Maharashtra Live News Update: जामखेली धरण पूर्ण क्षमतेने भरून झाले ओव्हरफ्लो

Nitesh Rane : विषय थेट अंतरपाटापर्यंत गेला, यांच्यामध्ये नवरदेव कोण अन् नवरी कोण? नितेश राणेंचा खोचक सवाल

Thackeray: पुष्पा ते लाडकी बहीण, मुंबईत ठाकरेंची तोफ धडाडली; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे

Banana Cake: घरीच झटपट बनवा सॉफ्ट अन् टेस्टी बनाना केक, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT