ravindra jadeja saam tv
Sports

Ravindra Jadeja On Kapil Dev: भारतीय खेळाडूंना अहंकारी म्हणणाऱ्या कपिल देव यांना रविंद्र जडेजाचे रोखठोक उत्तर,म्हणाला...

Ravindra Jadeja Statement: क्रिकेटपटू कपिल देव यांनी भारतीय खेळाडूंना अहंकारी म्हटले होते. आता भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाने या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Ankush Dhavre

India vs West Indies 3rd ODI: भारतीय संघ सध्या वेस्टइंडीज दौऱ्यावर आहे. या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका सुरू आहे. मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाला ६ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला होता.

या पराभवानंतर भारतीय संघातील फलंदाजांवर जोरदार टीका केली गेली होती. माजी भारतीय क्रिकेटपटू कपिल देव यांनी भारतीय खेळाडूंना अहंकारी म्हटले होते. आता भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाने या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

वेस्टइंडीज विरूद्धच्या तिसऱ्या सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना रविंद्र जडेजा म्हणाला की, ' ते काय म्हणाले याबाबत जास्त काही माहित नाही. मी सोशल मीडियावर अशा गोष्टी सर्च करत नाही. प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. प्रत्येक खेळाडू आपल्या खेळाचा आनंद घेण्यासह प्रचंड मेहनत देखील घेत आहे. खेळाडूंना संघात संधी मिळाल्यानंतर ते हलक्यात न घेता, मैदानात जाऊन आपलं १०० टक्के देण्याच्या प्रयत्नात असतात.'

तसेच तो पूढे म्हणाला की, 'जेव्हा भारतीय संघ पराभूत होत असतो. त्यावेळी असे प्रश्न उपस्थित केले जातात. कुठलाच खेळाडू अंहकारी नाही. सर्व खेळाडू भारतीय संघासाठी खेळत असताना आपली सर्वश्रेष्ठ कामगिरी करण्याच्या प्रयत्नात असतात. आम्ही देशासाठी खेळताना प्रचंड मेहनत घेत असतो. ' (Latest sports updates)

काय म्हणाले होते कपिल देव?

भारतीय खेळाडूंवर जोरदार टीका करताना कपिल देव म्हणाले होते की,'कधी कधी खूप पैसा आला की अहंकार येतो. भारतीय खेळाडू पैशाच्या अहंकारात बुडाले आहेत. या क्रिकेटपटूंना वाटते की त्यांना सर्व काही माहित आहे. हे खेळाडू पैशाच्या गर्वात माजी खेळाडूंचा सल्ला घेत नाहीत आणि तीच चूक पुन्हा पुन्हा करतात.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: Mumbai: कांदिवलीत ऑइलमुळे १४ दुचाकींचे अपघात; अनेक जण जखमी!

Health Tips : जेवण करताना वारंवार जीभ दातात का अडकते? जाणून घ्या कारणे आणि आरोग्य टिप्स

मुंबई-नागपूर महामार्गावर ट्रक-कारची समोरासमोर धडक; दोघांचा जागीच मृत्यू, धडकेनंतर उघडलं गांजाचं गुपित

Ladki Bahin Yojana : पात्र आहात पण खात्यावर ₹१५०० येत नाहीत? लाडक्या बहिणींनो हे काम आताच करा

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शरद पवार सरसावले! 'या' शहरासाठी 'इतक्या' लाखांची मदत|VIDEO

SCROLL FOR NEXT