hasan mahmud ravindra jadeja twitter
Sports

IND vs BAN, 1st Test: हसन महमूद अन् रविंद्र जडेजा यांच्यात जोरदार धडक! पाहा VIDEO

Hasan Mahmud- Ravindra Jadeja Collision: भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटीत हसन महमूद आणि रविंद्र जडेजा भिडल्याचे पाहायला मिळाले आहे.

Ankush Dhavre

भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना सुरु आहे. हा सामना चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाला सुरुवातीला ३ मोठे धक्के बसले. मात्र त्यानंतर रिषभ पंत आणि यशस्वी जयस्वालने मिळून भारतीय संघाचा डाव सांभाळला. दरम्यान सामना सुरु असताना, बांगलादेशचा गोलंदाज हसन महमूद आणि रविंद्र जडेजा हे दोघेही एकमेकांना धडकले. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

बातमी अपडेट होत आहे.

भारतीय संघाला सुरुवातीला मोठे धक्के बसल्यानंतर यशस्वी जयस्वाल आणि रिषभ पंतने मिळून महत्वपूर्ण अर्धशतकी भागीदारी केली आणि भारतीय संघाला दमदार कमबॅक करुन दिलं. दरम्यान ही जोडी फुटल्यानंतर आर अश्विन आणि रविंद्र जडेजाने मिळून भारताचा डाव सांभाळला.

हसन महमूद या सामन्यात सुरुवातीपासून भारतीय संघासाठी डोकेदुखी ठरला आहे. त्याने सुरुवातीच्या एका तासातच विराट कोहली, रोहित शर्मा आणि शुभमन गिलला बाद करत भारतीय संघाला बॅकफूटवर ढकललं. मात्र त्यानंतर जडेजा आणि अश्विनने त्याच्या गोलंदाजीवर आक्रमक फलंदाजी केली. दरम्यान एका षटकात रविंद्र जडेजा स्ट्राईकला असताना हसन महमूद आणि रविंद्र जडेजा यांच्यात धडक झाली. मात्र धडक झाल्यानंतर दोघेही एकमेकांना पाहून हसले.

या सामन्यासाठी अशी आहे भारतीय संघाची प्लेइंग ११:

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, आकाश दीप, मोहम्मद सिराज.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: संतापजनक! बेशुद्ध करत महिलेवर बलात्कार; उपचाराच्या बहाण्याने दिलं भूलचं इंजेक्शन,नंतर...

Maharashtra Live News Update: ठाकरे गटाला मोठा धक्का, गुहागरमधील नेत्या शिवसेनेत प्रवेश करणार

Malshej Ghat Kalu Waterfall Tragedy : मुसळधार पावसामुळे नदीला अचानक पूर, ३०० पर्यटक अडकले; सुटकेचा थरार कॅमेऱ्यात कैद, VIDEO

Biscuits Side Effects: तुम्हालाही बिस्कीट खायला आवडतं? पण होतात 'हे' गंभीर परिणाम, एकदा वाचाच

Mansa Devi Temple: शॉर्ट सर्किटची अफवा; अरुंद पायऱ्या आणि फक्त एकच रस्ता, मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी ; थरकाप उडवणारा Video Viral

SCROLL FOR NEXT