IPL 2021: तालिबानच्या कब्जानंतरही राशिद खान आणि महमंद नबी खेळणार  Twitter/@ANI
क्रीडा

IPL 2021: तालिबानच्या कब्जानंतरही राशिद खान आणि महम्मद नबी खेळणार

काबुलमध्ये (Kabul) प्रवेश केल्यानंतर तालिबानने (Taliban) आता संपूर्ण अफगाणिस्तानचा (Afganistan) ताबा घेतला आहे.

वृत्तसंस्था

काबुलमध्ये (Kabul) प्रवेश केल्यानंतर तालिबानने (Taliban) आता संपूर्ण अफगाणिस्तानचा (Afganistan) ताबा घेतला आहे. रविवारी त्यांनी अफगाणिस्तानचे राष्ट्रपती भवन काबीज केले आणि यासह अफगाणिस्तान सरकार कोसळले. अहवालानुसार, राष्ट्रपती अश्रफ घनी (Ashraf Ghani) यांनी देश सोडला आहे आणि लवकरच तालिबान अफगाणिस्तानात पुन्हा इस्लामिक अमिरात स्थापन करण्याची घोषणा करू शकते.

यामुळे अफगाण लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे आणि ते आपला देश सोडून जगभर स्थलांतर करत आहेत. अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू राशिद खान आपल्या देशात होत असलेल्या अराजकामुळे खूप नाराज आहे. अफगाणिस्तानच्या नागरिकांची अशी अवस्था पाहून राशिद रात्रभर झोपू शकला नाही. राशिद आणि अष्टपैलू मोहम्मद नबी यांनी याआधी जगातील लोकांना आपल्या देशाला मदत करण्याचे आवाहन केले होते.

Rashid Khan Post

अफगाणिस्तानातील परिस्थिती पाहता पुढच्या महिन्यात सुरु होणाऱ्या आयपीएल २०२१ मध्ये राशिद आणि नबी खेळणार का? असा प्रश्न विचारला असता संघाच्या व्यवस्थापकांकडून याला होकार देण्यात आला आहे. एसआरएचचे सीईओ के. शानमुगम म्हणाले की, अफगाणिस्तानचे दोन्ही खेळाडू संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयपीएलचा भाग असतील. "आम्ही सध्या काय घडत आहे, याबद्दल बोललो नाही, परंतु ते स्पर्धेसाठी उपलब्ध असणार आहेत." युएईमध्ये संघ कधी पोहचणार यावर विचारले असता ते म्हणाले ३१ ऑगस्टपर्यंत आम्ही युएईला रवाना होणार आहोत.

इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसनने खुलासा केला आहे. फिरकीपटू राशिद खान अफगाणिस्तानच्या परिस्थितीमुळे चिंतेत आहे आणि आपल्या कुटुंबाला देशाबाहेर नेण्यास असमर्थ आहे. अफगाणिस्तानमध्ये सुरू असलेल्या गोंधळामुळे काबुलच्या हमीद करझई इंटरनॅशनल (एचकेआय) विमानतळावर जगभरातील विमान उड्डाणांवर परिणाम झाला आहे. रशीद सध्या यूके मध्ये 'द हंड्रेड'मध्ये ट्रेंट रॉकेट्स कडून खेळत आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

KL Rahul: गुड न्यूज! भारताच्या स्टार खेळाडूच्या घरी पाळणा हलणार; पोस्ट शेअर करत दिली माहिती

Mumbai -Pune Expressway : नियम मोडाल तर टप्प्यात याल! मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून प्रवास करणाऱ्यांवर आता बारीक नजर!

Pankaja Munde : महायुतीतून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असणार? पंकजा मुंडे थेट बोलल्या

Maharashtra News Live Updates: पूजा खेडकर प्रकरण सुनावणी अपडेट : दिल्ली हायकोर्टातील आजची सुनावणी टळली

Team India: विराट- रोहितने आता एकच काम करावं..ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाने दिला लाखमोलाचा सल्ला

SCROLL FOR NEXT