रणजी ट्रॉफी स्पर्धेतील गेल्या हंगामात मुंबई आणि विदर्भ हे दोन्ही संघ फायनलमध्ये आले होते. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पार पडला होता. मुंबईने होमग्राऊंडवर शानदार विजय मिळवत रणजी ट्रॉफी उंचावली होती.
दरम्यान या हंगामातील सेमीफायनलचा सामना मुंबई आणि विदर्भ या दोन्ही संघांमध्ये पार पडला. मात्र यावेळी मैदान विदर्भ संघाचं होतं आणि बाजीही विदर्भानेच मारली. रणजी ट्रॉफीच्या फायनलचा बदला घेत विदर्भाने मुंबईचा पराभव करत फानयलचं तिकिट कन्फर्म केलं आहे.
विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर पार पडलेल्या या सामन्यात विदर्भ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. विदर्भ संघाकडून पहिल्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या दानिश मलेवारने सर्वाधिक ७९ धावांची खेळी केली. तर ध्रुवा शोरेने ७४ धावा करत संघाची धावसंख्या ३८३ धावांवर पोहोचवली.
विदर्भाचा डाव ३८३ धावांवर आटोपल्यानंतर मुंबईकडे मोठी आघाडी घेण्याची संधी होती. मात्र मुंबईचा पहिला डाव अवघ्या २७० धावांवर आटोपला. मुंबईकडून आकाश आनंदने सर्वाधिक १०६ धावांची खेळी केली. तर इतर कुठल्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आल नव्हती. यासह विदर्भाला दुसऱ्या डावात आघाडी मिळाली.
या सामन्यात मुंबईने विदर्भासमोर जिंकण्यासाठी ४०६ धावांचे आव्हान ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना मुंबईकडून शार्दुल ठाकूरने सर्वाधिक ६६ धावांची खेळी केली. तर सलामीला आलेल्या आकाश आनंदने ३९, सूर्यकुमार यादवने २३, शम्स मुलानी ४६ , तनुष कोटीयानने २६ आणि शेवटी मोहित अवस्थीने ३४ धावांची खेळी केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.