Ranji Trophy 2024 X
Sports

Ranji Trophy: रणजीत गोलंदाजांचा जलवा; डेब्यू सामन्यात जम्मूच्या गोलंदाजाने पटकावल्या १० विकेट

Ranji Trophy 2024: रणजी ट्रॉफी २०२३-२४ चे सामने सुरू असून रविवारी झालेल्या या सामन्यात जबरदस्त विक्रम पहायला मिळालेत. जलज सक्सेनाने बंगाल विरुद्धात झालेल्या सामन्यात ९ विकेट घेत अनोखा विक्रम केला. हा विक्रम लोकांच्या नजरेत येत नाही तोच एका गोलंदाजाने नवा विक्रम केलाय. या पठ्ठ्याने समोरी संघातील अख्ख्या खेळाडूंची बत्या गुल केल्या.

Bharat Jadhav

Ranji Trophy Jammu Bowler Vanshaj Sharma Took 10 Wickets:

रणजी ट्रॉफी २०२३-२४ चे सामने सुरू असून रविवारी झालेल्या या सामन्यात एक जबरदस्त विक्रम पहायला मिळाला. यात एक केरळमधील ३७ वर्षीय जलज सक्सेनाचा विक्रम आहे. जलज हा अनुभवी खेळाडू असून तो ऑफब्रेक गोलंदाज आहे. जलज सक्सेनाने बंगाल विरुद्धात झालेल्या सामन्यात ९ विकेट घेत अनोखा विक्रम केला. हा विक्रम लोकांच्या नजरेत येत नाही तोच एका गोलंदाजाने नवा विक्रम केलाय. या पठ्ठ्याने समोरी संघातील अख्ख्या खेळाडूंची बत्या गुल केल्या.(Latest News)

जम्मूचा असलेल्या गोलंदाजाने एकट्यानेच १० विकेट घेत रणजी समान्यात नवीन विक्रम प्रस्थापित केलाय. या गोलंदाजाचे नाव वंशज शर्माने १० विकेट घेतल्या. आधी जलज सक्सेनाच्या विक्रमाबद्दल जाणून घेऊ. याने बंगालविरुद्ध सुरू असलेल्या सामन्यात पहिल्या डावात ४० धावा केल्या. त्यानंतर गोलंदाजी करताना ६८ धावा देत ९ विकेट घेतल्या. त्याला फक्त सलामीवीर रणज्योत सिंगची एक विकेट घेता आली नाही. नाहीतर त्याने १० विकेट घेत इतिहास रचला असता.

जिम लेकर, अनिल कुंबळे आणि एजाज पटेल यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ही कामगिरी केलीय. जलजचा पराक्रम इतकाच नाहीये. त्याने पुन्हा ३७ धावा केल्या आणि ४ विकेट्स आपल्या नावावर केल्या.

जम्मूच्या वंशज शर्माचा पराक्रम

गेल्या काही वर्षांत जम्मू-काश्मीरमधून अनेक मोठे क्रिकेटपटू उदयास आलेत. या खेळाडूंनी देशपातळीवर मोठे नाव कमावले आहेत. आता यात एक नवीन नाव जोडले गेले आहे, ते म्हणजे वंशज शर्मा. वंशजने पुद्दुचेरीविरुद्धच्या रणजी सामन्यातून प्रथम श्रेणी पदार्पण केलं. २० वर्षीय वंशज हा डावखुरा मध्यम गती गोलंदाज आहे.

त्याने पुद्दुचेरीविरुद्धच्या पदार्पणाच्या सामन्यात १० विकेट घेतल्या. त्याच्या या १० विकेट संपूर्ण सामन्यात आल्या. पहिल्या डावात त्याने ७४ धावांत ५ बळी घेतले. त्यानंतर दुसऱ्या डावात १६ धावांत ५ विकेट्स घेतल्या.पदार्पणाच्या सामन्यातच तो जम्मू-काश्मीरच्या विजयाचा हिरो ठरला. वंशज शर्मा सामन्याच्या एका दिवसाआधी आला होता. तो पदार्पण करणार असल्याचं त्याला माहिती नव्हते. जम्मूमध्ये बडोदा विरुद्ध सीके नायडू ट्रॉफी सामना खेळत असताना त्याला रणजी सामना खेळण्यासाठी फोन आला असल्याचं वंशज म्हणाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT