Ramandeep Singh took unbelievable catch to dismiss arshin kulkarni in lsg vs KKR match watch video amd2000 twitter
Sports

Ramandeep Singh Catch: लखनऊमध्ये अवतरला 'सुपरमॅन' ; रमनदीपने २१ मीटर मागच्या दिशेने धावत टिपला IPL चा बेस्ट कॅच - Video

LSG vs KKR, Ramandeep Singh Catch Video: आयपीएल २०२४ स्पर्धेतील ५४ व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात रमनदीप सिंगने एक भन्नाट झेल टिपला आहे.

Ankush Dhavre

आयपीएल २०२४ स्पर्धेतील ५४ व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात लखनऊला घरच्या मैदानावर चितपट करत सर्वात मोठा विजय मिळवला. या विजयासह कोलकाता नाईट रायडर्स संघाने गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली आहे. या सामन्यादरम्यान रमनदीप सिंगने टिपलेला झेल सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय. या झेलचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

२१ मीटर लांब धावत टिपला झेल.

कोलकाता नाईट रायडर्स संघातील खेळाडू रमनदीप सिंग आपल्या फलंदाजीसह उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी देखील ओळखला जातो. त्याने लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात याचाच एक उत्तम नमुना सादर करून दाखवला आहे. मिचेल स्टार्कने लखनऊ सुपर जायंट्सचा फलंदाज अर्शिन कुलकर्णीला लेंथवर चेंडू टाकला. हा चेंडू बॅटची कडा घेत हवेत गेला.

चेंडू हवेत जाताच रमनदीप सिंग चेंडूच्या मागे धावला. तो कमीत कमी २१ मीटर लांब धावला आणि उलट्या दिशेने धावत डाईव्ह मारत भन्नाट झेल टिपला. हा झेल पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. या भन्नाट झेलसह त्याने अर्शिन कुलकर्णीला पॅव्हेलियनची वाट दाखवली.

रमनदीप सिंगने क्षेत्ररक्षणात उत्तम कामगिरी केलीच यासह फलंदाजीतही दमदार खेळ करून दाखवला. त्याने पहिल्या डावात फलंदाजीला येत अवघ्या ६ चेंडूत २५ धावा चोपल्या. यादरम्यान त्याने १ चौकार आणि ३ षटकार खेचले.

या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने २० षटक अखेर ६ गडी बाद २३५ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना लखनऊ सुपर जायंट्सचा संघ १६.१ षटकात १३७ धावांवर संपुष्टात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind Vs Eng Lord Test : जे सचिन-विराटला जमलं नाही, ते केएल राहुलनं करुन दाखवलं, पठ्ठ्यानं लॉर्ड्सचं मैदान गाजवलं

जगात मुस्लीम लोकसंख्येचा विस्फोट,भारत होणार लोकसंख्येत मोठा मुस्लीम देश? देशात हिंदू लोकसंख्या किती?

मुंडेंच्या तिसऱ्या लेकीची राजकारणात एन्ट्री, यशश्री मुंडे राजकारणाच्या मैदानात,यशश्री लढवणार वैद्यनाथ बँकेची निवडणुक

Maharashtra Politics: राऊतां विरोधात शिरसाटांनी ठोकला शड्डू,'बदनामीसाठी मॉर्फ व्हिडीओ', शिरसाटांचा दावा,'पैशांच्या बॅगेचे आणखी व्हिड़िओ बाहेर काढू

Maharashtra Politics: शिलेदारांनी वाढवल्या शिंदेंच्या अडचणी?आपल्याच नेत्यांमुळे शिंदे चक्रव्युहात? खोतकर, शिरसाटांसह गायकवाडही अडचणीत

SCROLL FOR NEXT