KKR vs LSG Ramandeep Catch Video:
आयपीएलचा २८ वा सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्सच्या संघात होत आहे. हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळला जात असून केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकली. नाणेफेक जिंकल्यानंतर केकेआर प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. केकेआरने लखऊनच्या संघाला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखलं. यावेळी केकेआरचा रमनदीप सिंह घेतलेला झेलने सर्वांचे लक्ष वेधलं.(Latest News)
रमणदीप सिंहने १ सेकंदापेक्षा कमी रिॲक्शन टाइममध्ये अप्रतिम झेल घेऊन सर्वांना आश्चर्यचकित केलं. मिचेल स्टार्कने डावातील ५ वे षटक टाकले. या षटकाच्या चौथ्या चेंडूवर दीपक हुडाने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू हवेत गेला. बॅकवर्ड पॉइंटवर उभ्या असलेल्या रमणदीप सिंगने बिबट्यासारखी चपळता दाखवत अप्रतिम झेल घेतला. त्याचा शानदार झेल पाहून सहकारी खेळाडू अवाक झालेत.
पापणी लपकेपर्यंत रमनदीपने झेल पूर्ण केल्याने नेटकरीदेखील त्याचं कौतुक करत आहेत. रमनदीपच्या या चपळ क्षेत्ररक्षणामुळे दीपक हुडाला अवघ्या ८धावांवर आपली विकेट द्यावी लागलीय. प्रथम फलंदाजी करताना लखनऊ सुपर जायंट्स संघाची सुरुवात चांगली झाली नाही. या सामन्यातही क्विंटन डी कॉक चांगला खेळ करू शकला नाही. क्किंटन डी कॉकने ८ चेंडूंचा सामना केला आणि १० धावा केल्या. केएल राहुलने ३९ धावा केल्या. राहुलने २७ चेंडूंचा सामना करत ३ चौकार आणि २ षटकारही ठोकले.
आयुष बडोनीलाही चांगली सुरुवात केल्यानंतर मोठी खेळी खेळता आली नाही. त्याने २९ धावा केल्या. या सामन्यात मार्कस स्टॉयनिस देखील चांगला खेळ करू शकला नाहीये. स्टॉयनिसने फक्त १० धावा केल्या. शेवटच्या षटकांमध्ये फलंदाजीला आलेल्या निकोलस पुरनने फटकेबाजी करत संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले. पुरनने ३२ चेंडूंचा सामना करत ४५ धावांची खेळी खेळली, ज्यात ४ षटकार आणि २ चौकारांचा समावेश होता.
क्रुणाल पांड्या ७ धावा करून नाबाद राहिला. अर्शद खान शेवटच्या चेंडूवर बोल्ड झाला. त्याने ५ धावा केल्या. केकेआरच्या मिचेल स्टार्कने सर्वाधिक विकेट घेतल्या. स्टार्कने ३ बळी घेतले. वैभव अरोरा, सुनील नारायण, वरुण चक्रवर्ती आणि आंद्रे रसेल यांनी प्रत्येकी १ बळी घेतले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.