RR Owner viral video X
Sports

RCB कडून पराभव अन् राजस्थानच्या CEO नं थेट दारुचं दुकान गाठलं, सलग ५ सामने गमावल्याचं दु:ख पचवण्यासाठी...

IPL 2025 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध राजस्थान रॉयल्स या सामन्यात बंगळुरूचा विजय झाला. सलग ५ सामन्यात राजस्थानचा पराजय झाला. या सामन्यानंतर राजस्थानच्या सीईओचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

Yash Shirke

IPL 2025 मधील ४२ व्या सामन्यात काल बंगळुरू आणि राजस्थान हे दोन संघ आमनेसामने आले. रॉयल लढतीत बंगळुरूने राजस्थानवर मात केली. हा सीझन राजस्थानसाठी फार वाईट ठरत आहे. राजस्थान रॉयल्सने ९ सामन्यांपैकी ७ सामने गमावले आहेत. राजस्थानच्या संघाला सलग पाच सामन्यांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे. कालच्या पराभवानंतर राजस्थान रॉयल्सचे सीईओचा व्हिडीओ व्हायरल झाला.

व्हायरल व्हिडीओमध्ये राजस्थान रॉयल्सचे सीईओ जेक लश मॅक्रम बंगळुरूच्या एका मोठ्या दारुच्या दुकानात जाताना दिसतो. त्याच्यासोबत राजस्थान संघाची जर्सी घातलेला एक व्यक्ती चालत जात असल्याचे पाहायला मिळते. व्हिडीओमध्ये आरसीबीचा एक समर्थकाने मॅक्रम राजस्थानचा पराभव पचवण्यासाठी मद्यप्राशन करायला जात आहे, असे म्हटल्याचे दिसते. कॅप्शनमध्ये मॅक्रम टोनिक या दारुच्या दुकानाजवळ जात आहे असे लिहिले आहे.

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान परागने काल टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी केली. २० ओव्हर्समध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या खेळाडूंनी २०५ धावा केल्या. २०६ धावांचे लक्ष गाठण्यात राजस्थानचा संघ अपयशी ठरला. यशस्वी जयस्वालने सुरुवातीला आणि ध्रुव जुरेलने शेवटच्या ओव्हर्समध्ये चांगली कामगिरी केली. जुरेलची विकेट पडल्यानंतर राजस्थानने सामना गमावला.

दुसऱ्या बाजूला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने कालच्या सामन्यात विजय मिळवत घरच्या स्टेडियमवर पराभूत होण्याची परंपरा मोडीत काढली. याआधी तीनदा आरसीबीचा संघ चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळला होता. या तिन्हीही सामन्यांमध्ये त्यांना पराभव पचवावा लागला होता. कालच्या विजयानंतर बंगळुरूने पॉईंट्स टेबलवर तिसऱ्या स्थानी झेप घेतली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Oil Benefits: हिवाळ्यात केस गळतीला करा बाय बाय, घरीच बनवा कढीपत्ता, कांदा आणि कोरफडीचा तेल

Maharashtra Live News Update: - अंबाजोगाई बीड रोडवर ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात दुचाकीस्वार जागेवर ठार

मोठी बातमी! जामखेडमध्ये हॉटेलवर अंदाधुंद गोळीबार; रोहित पवारांच्या पायात घुसली गोळी

Papad Curry Recipe : रोजची भाजी खाऊन कंटाळलात? मग, झटपट बनवा 'पापड करी'

आश्रमशाळेतील विद्यार्थ्यासोबत झोपेत भयंकर घडलं; डोक्यावरचे आणि भुवयांवरचे केस कापले|VIDEO

SCROLL FOR NEXT