MI vs RR IPL Match Saam tv
क्रीडा

MI vs RR IPL Match: सलामीवीर यशस्वीची शतकी खेळी; राजस्थानकडून मुंबईला २१३ धावांचं आव्हान

राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करत २० षटकात २१२ धावा चोपल्या.

Vishal Gangurde

MI vs RR IPL Match News: मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्या दरम्यान ४२ सामना सुरू आहे. राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करत २० षटकात २१२ धावा चोपल्या. तर राजस्थानचा सलामीवीर यशस्वी १२४ धावा करत तंबूत परतला. तर मुंबई इंडियन्सच्या अरशद खानने तीन गडी बाद केले. (Latest Marathi News)

राजस्थान रॉयल्सची फलंदाजीची सुरुवात चांगली झाली. बटलर आणि यशस्वी जैसवालने पहिल्या विकेटसाठी ७२ धावांची भागीदारी रचली. कर्णधार संजू सॅमसनने १० चेंडूत १४ धावा कुटल्या. देवदत्त २ धावा करून तंबूत परतला.

शिमरोन हेटमायरने ९ चेंडूत ८ धावा केल्या. ध्रुवने दोनच धावा कुटल्या. यशस्वीच्या व्यतिरिक्त राजस्थानचा कोणताही खेळाडू २० धावांच्या पुढे गेला नाही. यशस्वी शेवटच्या षटकात बाद झाला. त्याने ६२ चेंडूत १२४ धावा कुटल्या. यशस्वीने १६ चौकार आणि ८ षटकार लगावले.

मुंबई इंडियन्ससाठी अरशद खानने तीन गडी बाद केले. तर पीयूष चावलाने दोन गडी बाद केले. यशस्वीच्या शतकी खेळीमुळे राजस्थानने मुंबईला २१३ धावांचं आव्हान दिलं आहे.

यशस्वी एकटाच भिडला

राजस्थानचा सलामीवीर यशस्वी जैसवाल मुंबईच्या गोलंदाजांना एकटा भिडला. त्याने ६२ चेंडूत १२४ धावा ठोकल्या. यशस्वीचं हे आयपीएलमधील पहिलेच शतक आहे. यशस्वीच्या शतकात १६ चौकार आणि ८ षटकारांचा सामावेश आहे. राजस्थानकडून जैसवालनंतर जॉस बटलरने सर्वाधिक 18 धावा केल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sharad Pawar vs Ajit Pawar : साहेब की दादा, बारामतीमध्ये आज कुणाचा आव्वाज घुमणार?

Maharashtra Election:प्रचाराच्या तोफा थंडावणार, मतदानाच्या ४८ तासाआधी काय करावे? काय करु नये?

Maharashtra Election : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! छुप्या प्रचारावर करडी नजर

Viral Video: रुग्णवाहिकेला रस्ता न देणे महागात पडले, पोलिसांनी शिकवल धडा, लाखोंचा दंड, लायसन्सही रद्द, Video बघाच

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! दर महिन्याला मिळणार ९००० रुपये; कसं? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT