Samit Dravid सोशल मीडिया
Sports

सेम टू सेम द्रविड स्टाइल, पोरानं कमाल केली, सिक्सर असा खेचला की सर्व बघतच बसले, VIDEO

Samit Dravid : पदार्पणात समितने विस्फोटक फलंदाजी करत सर्वांचे लक्ष वेधलेय.

Namdeo Kumbhar (नामदेव कुंभार)

samit rahul dravid : भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडचा मुलगा समित द्रविडने टी२० क्रिकेटमध्ये पदार्पण केलेय. समित द्रविडने कर्नाटक राज्य क्रिकेट संघाच्या (KSCA) महाराजा टी20 ट्रॉफीत पदार्पण केलेय. पदार्पणात समितने विस्फोटक फलंदाजी करत सर्वांचे लक्ष वेधलेय.

समित द्रविड याने मैसूर वॉरियर्सकडून खेळताना वादळी फलंदाजी केली. समित द्रविड याचा उभा राहण्याची स्टाईक राहुल द्रविड याच्यासारखीच दिसत आहे. त्याने रोहित शर्मा स्टाईलने मारलेला षटकार सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. समित द्रविडचा फटका पाहून समालोचकांनीही त्याचं तोंडभरुन कौतुक केलेय.

मैसूर वॉरियर्स आणि ब्लास्टर्स यांच्यामध्ये आमनासामना झाला. ब्लास्टर्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पावसामुळे हा सामना १८ षटकांचा घेण्यात आला. मैसूर वॉरियर्सकडून मनोज भांडगे (58*) आणि हर्षिल धर्माणी (50) यांनी दमदार अर्धशतकी खेळी केली. मैसूर वॉरियर्सने १८ षटकात सहा विकेटच्या मोबदल्यात १८२ धावांचा पाऊस पाडला.

चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी समित द्रविड उतरला होता. त्यावेळी वॉरियर्सची स्थिती ४.२ षटकात दोन विकेट ५१ धावा आशी होती. त्याने गनेश्वर नवीनच्या चेंडूवर गगनचुंबी षटकार ठोकत सर्वांनाच चकीत केले. रोहित शर्माने विश्वचषकात नवीन उल हक यालाही असाच षटकार ठोकला होता. सेम तसाच षटकार समितने लावल्याचे नेटकरी बोलत आहेत.

पाहा व्हिडिओ...

समितला मोठी खेळी करता आली नाही. त्याला ९ चेंडूत फक्त सात धावाच करता आल्या. त्यामध्ये एका षटकाराचा समावेश होता. याच षटकाराची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. वॉरियर्सला हा सामना गमावावा लागला. ब्लास्टर्सने १७.१ षटकात १८३ धावा करत विजय मिळवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डेंग्यूच्या आजाराचा डास कसा ओळखाल?

वेताळवाडी किल्ल्यावर टोळक्यांची हुल्लडबाजी, पंचधातूची तोफ कोसळली, एक जण जखमी

Kiku Sharda: मी नेहमी शोसोबत...; द ग्रेट इंडियन कपिल शो सोडण्याबाबत किकू शारदाने व्यक्त केल्या भावना, म्हणाला...

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

Maharashtra Live News Update: पुण्यातील दगडूशेठ गणपती मिरवणुकीच्या रथाला आकर्षक रोषणाई

SCROLL FOR NEXT