विश्वचषकात आज शनिवारी ३५ वा सामना न्यूझीलंड आणि पाकिस्तानविरुद्ध सुरु आहे. या न्यूझीलंडच्या फलंदाजांनी पाकिस्तानच्या विरोधात धावांचा पाऊस पाडत पाकिस्तानला चारशेपार धावांचा डोंगर उभारला. एवढं मोठं आव्हान उभारताना रचिन रविंद्रने शतकी खेळी खेळली. रचिनने ८८ चेंडूत १४ चौकर आणि १ षटकारांच्या मदतीने विश्वचषकातलं तिसरं शतक ठोकलं. २३ वर्षांच्या रचिनने शतक ठोकत न्यूझीलंडसाठी इतिहास रचला. (Latest Marathi News)
रचिन रविंद्रने विश्वचषकाच्या इतिहास तीन शतक ठोकण्याचा इतिहास रचला आहे. २३ वर्षांच्या रचिनने विश्वचषकात तीन शतक ठोकणारा युवा फलंदाज ठरला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
तीन शतक ठोकत रचिन रविंद्रचाही विक्रम मोडला आहे. २३ व्या वयातही सचिननेही विश्वचषकात दोन शतक ठोकले होते. डेब्यू विश्वचषकात तीन शतक ठोकणारा रचिन जगातील पहिला फलंदाज ठरला आहे.
रचिनने तिसऱ्या स्थानावरही विल्यमसनच्या उपस्थितीत संघाची कमान सांभाळली होती. पाकिस्तानच्या विरोधात रचिनने झुंजार खेळी खेळली. त्यात आजच्या सामन्यात रचिन आणि विल्यमसनने १८० धावांची भागीदारी रचली. तर या सामन्यात रचिनने ९८ चेंडूत १०८ धावा कुटल्या.
रचिन रविंद्र विश्वचषकात तुफान फॉर्ममध्ये आहे. रचिन यंदाच्या विश्वचषकात तुफान फलंदाजी करत सर्वाधिक धावसंख्या काढणाऱ्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. क्विंटन डी कॉकनंतर रचिनने विश्वचषकात ५०० धावांचा आकडा पार केला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.