r ashwin  saam tv
Sports

WTC Final 2023: WTC च्या फायनलपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का! संघातील दिग्गज गोलंदाज होऊ शकतो बाहेर; वाचा कारण

R Ashwin Injury Update: या सामन्यापूर्वी भारतीय संघाच्या चिंतेत वाढ झाली आहे.

Ankush Dhavre

WTC Final: आयपीएल २०२३ स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. साखळी फेरीतील सामने संपून आता प्लेऑफच्या सामन्यांना सुरुवात होणार आहे. तर येत्या २८ मे रोजी या स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे.

ही स्पर्धा झाल्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना पार पडणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.

दरम्यान या सामन्यापूर्वी भारतीय संघाच्या चिंतेत वाढ झाली आहे. संघातील प्रमुख गोलंदाज दुखापतग्रस्त झाला आहे.

शुक्रवारी पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पार पडला. या सामन्यापूर्वीच राजस्थान रॉयल्स संघाला मोठा धक्का बसला होता. नाणेफेकीच्या वेळी संजू सॅमसनने सांगितले की, पाठीच्या दुखापतीमुळे आर अश्विन खेळू शकणार नाहीये.

याचा राजस्थान रॉयल्स संघाला धक्का बसला होता. कारण आर अश्विन हा संघातील प्रमुख गोलंदाज आहे. मात्र फलंदाजांनी केलेल्या जोरदार कामगिरीच्या बळावर राजस्थान रॉयल्स संघाने ४ गडी राखुन जोरदार विजय मिळवला.

आर अश्विन वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतून बाहेर?

आर अश्वच्या दुखापतीबाबत कुठलीही अपडेट समोर आली नाहीये. राजस्थान रॉयल्स संघाचे साखळी फेरीतील सामने संपले आहेत. जर राजस्थान रॉयल्स संघ प्लेऑफसाठी पात्र ठरला, तर अश्विनच्या खेळण्यावर प्रश्चचिन्ह असेल.

दरम्यान या स्पर्धेनंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. या स्पर्धेत आर अश्विन हा भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज असणार आहे. मात्र जर तो दुखापतीमुळे बाहेर झाला, तर नक्कीच भारतीय संघाच्या चिंतेत भर पडणार आहे. (Latest sports updates)

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी असा आहे संघ:

भारतीय संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद. शमी, मोहम्मद. सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, इशान किशन (विकेटकिपर)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

सुप्रीम कोर्टात पोहोचला मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

SCROLL FOR NEXT