RCB vs PBKS highlights https://x.com/IPL
Sports

IPL 2025 : घरच्या मैदानावर RCB तिसऱ्यांदा ढेर, पंजाब किंग्सचा 5 गडी राखून विजय

RCB vs PBKS highlights : आयपीएल 2025 मध्ये पावसामुळे कमी झालेल्या सामन्यात पंजाब किंग्सने आरसीबीचा 5 गडी राखून पराभव केला. नेहाल वढेराने संयमी खेळी करत सामनावीर पुरस्कार पटकावला.

Namdeo Kumbhar

IPL 2025 Punjab vs RCB : आरसीबीला घरच्या मैदानावर सलग तिसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. पावसाने प्रभावित झालेल्या सामन्यातपंजाब किंग्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा ५ गडी राखून पराभव केला. १४ षटकांच्या सामन्यात पंजाब किंग्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि RCB ला ९५ धावांत रोखले. प्रत्युत्तरात, नेहाल वढेराच्या शानदार खेळीच्या जोरावर पंजाबने १३ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर विजय मिळवला. नेहाल वढेराला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

RCB ची खराब सुरुवात

पंजाब किंग्सच्या कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. RCB ची सुरुवात अत्यंत खराब झाली. अर्शदीप सिंगने पहिल्याच षटकात फिल सॉल्टला (४) बाद केले, तर विराट कोहली (४) याला मार्को जॅन्सनने पायचीत करत तंबूत धाडले. युजवेंद्र चहलनेही शानदार गोलंदाजी करत राजत पाटीदार (२३) आणि जितेश शर्मा (२) यांना बाद केले. RCB ची अवस्था ७ बाद ४२ अशी झाली होती. मात्र, टिम डेव्हिडने २६ चेंडूत 5० धावांची नाबाद खेळी करत आरसीबीला ९५ धावांपर्यंत पोहोचवले. पंजाबकडून अर्शदीप सिंग, मार्को जॅन्सन, युझवेंद्र चहल आणि हरप्रीत ब्रार यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.

पंजाबकडून सावध फलंदाजी

९६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाब किंग्सची सुरुवात खराब झाली. भुवनेश्वर कुमारने प्रभसिमरन सिंगला (१७) आणि जोश हेजलवूडने प्रियांश आर्याला (१६) बाद केले. जोश हेजलवूडने भेदक मारा करत आरसीबीच्या फलंदाजाला एकापाठोपाठ एक माघारी झाडले. हेजलवूडने श्रेयस अय्यर (७) आणि जोश इंग्लिस (१४) यांना बाद करत सामन्यात रंगत निर्माण केली. पण नेहाल वढेराने संयमी फलंदाजी करत पंजाबला विजय मिळवून दिला. नेहाल वढेराने संयमी खेळी खेळत १९ चेंडूत ३३ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ३ षटकार आणि २ चौकार लगावले. मार्कस स्टॉयनिसने नाबाद १२ धावा करत त्याला साथ दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा संघाची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT