Indian Premier League 2023 Points Table Saam TV
Sports

IPL 2023: आरसीबीने एकाच दगडात मारले दोन पक्षी; पंजाब पाठोपाठ मुंबईला इंडियन्सलाही दिला मोठा धक्का!

RCB vs PBKS : आज आरसीबीने एकाच दगडात दोन पक्षी मारले. आधी त्यांनी पंजाबचा पराभव केला. त्यानंतर सामना संपल्यानंतर मुंबई इंडियन्सलाही मोठा धक्का दिल्याचे आता समोर आले आहे.

Satish Daud

Indian Premier League 2023 Points Table : आयपीएलच्या १६ व्या हंगामातील २७ वा सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळवण्यात आला. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या आरसीबीने पंजाब किंग्सवर दणदणीत विजय मिळवला.

आरसीबीचा यंदाच्या हंगामातील हा तिसरा विजय आहे. दरम्यान, आज आरसीबीने एकाच दगडात दोन पक्षी मारले. आधी त्यांनी पंजाबचा पराभव केला. त्यानंतर सामना संपल्यानंतर मुंबई इंडियन्सलाही मोठा धक्का दिल्याचे आता समोर आले आहे. (Latest sports updates)

गेल्या सामन्यात आरसीबीला चेन्नई सुपरकिंग्जकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे आजच्या सामन्यात त्यांना विजय मिळवणे क्रमप्राप्त होते. दरम्यान, आजच्या सामन्याआधी आरसीबीच्या संघ व्यवस्थपनाने मोठी चाल खेळली. त्यांनी या सामन्याची सूत्रे विराट कोहलीकडे दिली.

आरसीबीने फाफ डू प्लेसिसला इफॅक्ट प्लेयर म्हणून मैदानात आणलं. फलंदाजीसाठी उतरलेला फाफ पुन्हा मैदानात आला नाही आणि कोहलीने संघाचे नेतृत्व करत आरसीबीला विजय मिळवून दिला. पण या विजयानंतर आरसीबीने मुंबईला धक्का दिल्याचे आता समोर आले आहे.

आरसीबीची गुणतालिकेत मोठी झेप

 पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीचा संघ ५ सामने खेळला होता. यापैकी त्यांना केवळ दोनच सामन्यात विजय मिळवता आला होता. तर तीन सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे आरसीबीच्या खात्यात फक्त ४ गुण जमा झाले होते. आजच्या सामन्यापूर्वी ते आठव्या क्रमांकावर होते.

मात्र, पंजाबला तब्बल २४ धावांनी पराभवाची धूळ चारत आरसीबीने दोन गुणांची कमाई तर केलीच याशिवाय नेट रनरेट सुद्धा सुधारून घेतला. त्यामुळे त्यांना गुणतालिकेत मोठी झेप घेता आली आणि ते पाचव्या क्रमांकावर विराजमान झाले. त्यामुळेच त्यांना मुंबई इंडियन्सला धक्का देता आला.

मुंबई इंडियन्सची गुणतालिकेत घसरण

या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या संघाचे सहा गुण होते आणि ते पाचव्या स्थानावर होते. मात्र, आरसीबीच्या विजयानंतर त्यांची सहाव्या स्थानावर घसरण झाली आहे. आरसीबीचे आणि मुंबईचे गुण जरी समान असले, तरी आरसीबीचा नेट रनरेट मुंबई इंडियन्सपेक्षा चांगला असल्याने ते वरचढ ठरले आहेत. आरसीबीने मुंबई इंडियन्सला पाचव्या स्थानावरून खाली ढकलले असून त्यांनी आता त्यांचे पाचवे स्थान पटकावले आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : भगवान गणेशाची उपासना फलदायी ठरेल, अचानक धनलाभ होईल; ५ राशींच्या लोकाचं नशीब फळफळणार

Maharashtra Live News Update : - नाशिकच्या इगतपुरीमध्ये आजपासून मनसेचं राज्यस्तरीय शिबिर

Success Story: वडील वीट भट्टीवर कामाला; लेक २२ व्या वर्षी IPS झाला; सफीन हसन यांचा प्रेरणादायी प्रवास

Monday Horoscope Update : संकष्टी चतुर्थीची उपासना ४ राशींसाठी ठरणार लाभदायक, वाचा आजचे राशी

Plane Crash : मोठी बातमी! उड्डाणानंतर विमानाला आग अन् एअरपोर्टजवळ कोसळलं, १५ जणांचा मृत्यू | VIDEO

SCROLL FOR NEXT