Shiva Anavekar Saam TV
Sports

CWE मनोरंजन व्यवसायिक कुस्ती लीगमध्ये पुण्याचा पैलवानाचा समावेश

सध्या शिवा खलीच्या ऍकॅडमी मध्ये प्रशिक्षक म्हणून काम तर करत आहेच पण त्या व्यतिरिक्त खली च्या इंस्टा वरच्या स्टोरीज आणि रिल्समध्येही त्याला खास महत्व प्राप्त झालं आहे,

अश्विनी जाधव - केदारी

पुणे: आंतरराष्ट्रीय कुस्ती पटू द ग्रेट खली याने डब्ल्यूडब्ल्यूएफच्या (WWE) धर्तीवर सुरू केलेल्या कॉंटिनेंटल रेसलिंग एंटरटेनमेंट अर्थात सी डब्ल्यू ई (CWE) या मनोरंजन करणाऱ्या व्यवसायिक कुस्ती लीगमध्ये पुण्यातील (Pune) शिवा आनवेकर (Shiva Anavekar) या तरुणाचा व्यावसायिक कुस्तीगीर म्हणून समावेश झाला आहे. शिवा आनवेकर हा मूळचा पुण्याचा तरुण, 6.5 उंची हेच थोडं वैशिष्ट्य, पदवी पर्यंतचं शिक्षण घेऊन सर्वसामान्य तरुणांप्रमाणे शिवाही सेल्समन म्हणून काम करु लागला, पण सर्वसामान्य नोकरीत त्याचं मन रमत नव्हतं, उंची आणि थोडीफार तब्येत असल्याने कुस्तीचा पर्याय त्याला खुणावत होता, अशातच द ग्रेट खली सोबत त्याचा संपर्क झाला, पुढे पंजाब जालंदरला खलीच्या अकॅडमी मध्ये या मराठी मुलाने प्रशिक्षण घेतलं आणि आज तो स्वतः एक सेलिब्रिटी झाला आहे. (Pune Latest News In Marathi)

सध्या शिवा खलीच्या ऍकॅडमी मध्ये प्रशिक्षक म्हणून काम तर करत आहेच पण त्या व्यतिरिक्त खली च्या इंस्टा वरच्या स्टोरीज आणि रिल्समध्येही त्याला खास महत्व प्राप्त झालं आहे, खली आणि शिवाच्या अनेक व्हिडिओजला लोकांची चांगलीच पसंती मिळतेय, लाखोंच्या घरात त्यांच्या व्हिडीओला लाईक्स असतात, मराठी मुलगा म्हणून शिवा या क्षेत्रात चांगली कामगिरी करत आहे. शिवा हा पुण्याचा असल्याने आणि तो एवढं नाव कमावत असल्याने पुण्याचं आणि महाराष्ट्राचं नाव जगाच्या पाठीवर जाणार आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: संजय राऊतांचा वार , अशोक चव्हाण यांचा पलटवार

Manache Ganpati : बाप्पाच्या आगमनाची वेळ ठरली! पुण्यातील मानाचे ५ गणपती कधी विराजमान होणार? वेळ आणि पथकांची यादी एका क्लिकवर

Nerul Tourism : मॉन्सूनमध्ये नेरुळची सफर ठरेल अविस्मरणीय, वीकेंडला फिरायला 'ही' ५ ठिकाणं आहेत एकदम खास!

Sanjay Gaikwad : बाईबद्दलच्या त्या वक्तव्यानं आमदार संजय गायकवाड अडचणीत; मध्यरात्री थेट गुन्हा दाखल

IAS Officer ला सस्पेंड करण्याचा अधिकार नेमका कोणाकडे असतो? राज्य की केंद्र सरकार?

SCROLL FOR NEXT