PT Usha saam tv
Sports

PT Usha : इतिहास रचला; भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्षपदी पीटी उषा

PT Usha elected first woman President of Indian Olympic Association

Siddharth Latkar

PT Usha : भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या (IOA) पहिल्या महिला अध्यक्षपदी पीटी उषा (Pilavullakandi Thekkeparambil Usha) यांची आज (शनिवार) अधिकृतपणे निवड करण्यात आली. प्रशासकीय मंडळाच्या निवडणुकीत निवडून आल्या. पीटी उषा यांच्या निवडीमुळे देशाच्या क्रीडा क्षेत्रातील प्रशासनात एक नवीन युग सुरू झाल्याचे बाेलले जात आहे.

58 वर्षीय उषा यांनी अनेक आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले आहे. लॉस एंजेलिस ऑलिम्पिक (सन 1984) मध्ये चारशे मीटर अडथळा अंतिम फेरीत चौथे स्थान पटकावले हाेते. या निवडणुकीत सर्वोच्च पदासाठी बिनविरोध निवडून आल्याचे घोषित करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेले निवृत्त न्यायमूर्ती एल नागेश्वर राव यांनी निवडणुक निरिक्षक म्हणून काम पाहिले.

जुलैमध्ये सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने (bjp) राज्यसभेवर उमेदवारी दिलेल्या उषा यांच्याविरोधात या निवडणुकीत (election) कोणीही लढण्यास तयार नव्हते. IOA चे इतिहासात संघटनेचे नेतृत्व करणारी उषा या पहिली ऑलिंपियन ठरली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi Marathi Wishes: पाऊले चालती पंढरीची वाट...आषाढी एकादशी निमित्ताने प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

Ashadhi Ekadashi: आज आषाढी-देवशयनी एकादशीला करा हे सोपे उपाय; जीवनातील समस्या होतील पटकन दूर

SCROLL FOR NEXT