CSK IPL 2025 : चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाड दुखापतीग्रस्त आहे. त्याने आयपीएल २०२५ मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सीएसकेच्या कर्णधारपदाची जबाबदारी महेंद्रसिंह सोपवण्यात आली आहे. काल चेन्नई सुपर किंग्सच्या सोशल मीडिया अकांउट्सवर याबाबतची घोषणा करण्यात आली.
एमएस धोनीच्या रुपात चेन्नईला ऋतुराज गायकवाडची रिप्लेसमेंट मिळाली आहे. ऋतुराज गायकवाड हा चेन्नईसाठी तिसऱ्या क्रमावर फलंदाजी करतो. तो आयपीएलमधून बाहेर पडल्याने त्याच्या जागी तिसऱ्या स्थानावर खेळायला कोणाला संधी मिळणार हा प्रश्न चाहत्यांना आणि क्रिकेटप्रेमींना पडला आहे.
ऋतुराज गायकवाडच्या जागी पृथ्वी शॉला चेन्नईमध्ये संधी दिली जाईल असा अंदाज वर्तवला जात आहे. पृथ्वी शॉ आयपीएल २०२५ च्या मेगा ऑक्शनमध्ये अनसोल्ड राहिला होता. त्याच्यावर कोणीही बोली लावली नव्हती. तो बऱ्याच काळापासून क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहिला आहे. खराब फॉर्ममध्ये असतानाही पृथ्वीला चेन्नई खेळण्याची संधी देईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. तरीही अजून गायकवाडच्या रिप्लेसमेंटबाबतची सीएसकेकडून कोणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
अजिंक्य रहाणे, अंबाती रायडू, रॉबिन उथप्पा अशा अनेक आउट ऑफ फॉर्म खेळाडूंना चेन्नई सुपर किंग्समध्ये गेल्यानंतर फॉर्मचा सूर गवसला आहे. याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे अजिंक्य रहाणे. खराब फॉर्ममध्ये असताना रहाणे सीएसकेकडून खेळला होता. त्यानंतर रहाणेचा फॉर्म टिकून राहिला. या खेळाडूंच्या प्रमाणे पृथ्वी शॉचा देखील खराब फॉर्म सुरु आहे. त्यामुळे सीएसकेमध्ये गेल्यानंतर तो फॉर्ममध्ये येईल असे म्हटले जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.