कॉमनवेल्थ गेम्स २०२६ मध्ये दहाव्या दिवशी भारतावर सुवर्णपदकांचा वर्षाव झाला. भारताची गोल्डन गर्ल प्रीती पवार हिनं ५४ किलो वजनी गटाच्या फायनलमध्ये कॅनडाच्या स्कारलेट डेलगाडोला पराभूत करून सुवर्णपदकावर नाव कोरलं. त्यानंतर जॅस्मिन लंबोरिया हिनंही महिलांच्या ५७ किलो वजनी गटात फायनलमध्ये नॉर्दर्न आयर्लंडच्या मिकेला वॉल्श हिला ५-० ने पराभूत करून सुवर्णपदकाची कमाई केली. बॉक्सिंगमध्ये भारताला हा दुसरा, तर या स्पर्धेत एकूण सात सुवर्णपदके मिळाली.
भारतीय बॉक्सिंगपटू प्रीती पवार हिनं कॉमनवेल्थ गेम्समध्ये चमकदार कामगिरी केली. तिनं पहिल्यांदाच या स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली आहे. या स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच तिनं वर्चस्व राखलं होतं. राऊंड ऑफ १६ मध्ये तिनं डेबोरा मटेंजे, क्वार्टर फायनलमध्ये नॉर्थ आयर्लंडच्या निकोल क्लाइड आणि सेमिफायनलमध्ये जाम्बियाच्या कॅथरीन म्वापे यांना धूळ चारून फायनलमध्ये धडक दिली होती. तर फायनलमध्ये कॅनडाच्या स्कारलेटला तिन्ही फेऱ्यांमध्ये संधी न देता एकतर्फी विजय मिळवला आणि देशाला सुवर्णपदक मिळवून दिले.
महिला बॉक्सिंगच्या ५७ किलो वजनी गटात फायनलमध्ये भारताच्या जॅस्मिनने नॉर्दर्न आयर्लंडच्या मिकेला वॉल्शला नमवलं आणि सुवर्णपदक पटकावलं. पहिल्या फेरीत काट्याची टक्कर बघायला मिळाली. जॅस्मिनने ही फेरी ३-२ च्या फरकाने स्प्लिट निकालानं आपल्या बाजूने केली. तर दुसऱ्या फेरीत जोरदार कमबॅक करत अखेरीस ५-० ने सामना जिंकून बॉक्सिंगमध्ये दुसरं आणि भारताला एकूण सातवं सुवर्णपदक जिंकून दिलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.